डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
दिनांक 27/05/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे वरीष्ठांच्या परवानगीने रात्रोचे दरम्यान मौजा इंदिरानगर येथील वनउपज तपासणी नाक्यावर लावलेल्या नाकाबंदी दरम्यान (1) आशिष धनराज कुळमेथे, वय 28 वर्षे, रा. संजयनगर, चंद्रपुर ता. जि. चंद्रपुर, (2) धनराज मधुकर मेश्राम, वय 33 वर्षे, रा. नेहरुनगर, चंद्रपुर ता.जि.चंद्रपुर, (3) कु. ज्योती श्रीकृष्ण परचाके, वय 22 वर्षे, रा. शास्त्रीनगर, चंद्रपुर ता.जि. चंद्रपुर यांच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.34 बी.आर.4086 ची पंचासमक्ष तपासणी केली असता, वाहनाचे डिक्कीत एकुण 99,690/- रुपये किंमतीचा 6.646 कि.ग्रॅ. गांजा, 6,00,000/- रु. किमतीचे चारचाकी वाहन तसेच 20,000/- रुपये किंमतीचे मोबाईल असा एकुण 7,19,690/- रु किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदरचा अंमली पदार्थ (गांजा), मोबाईल तसेच गांजा वाहतुकीकरीता वापरलेले स्विफ्ट चारचाकी वाहन जप्त करुन नमुद आरोपीतांविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ नियम (एन.डी.पी.एस.) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस स्टेशन गडचिरोली येथील मपोउपनि संघमित्रा बांबोळे करीत असुन आरोपीतांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता, मा. न्यायालयाने सदर आरोपीतांचा दिनांक 31/05/2023 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन सदर गुन्ह्राचा तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल सा. तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता सा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात मसपोनि. रुपाली पाटील, पोहवा/ नरेश सहारे, पोहवा/ हेमंत गेडाम, पोना/सतिश कत्तीवार, पोना/राकेश सोनटक्के, पोशि/उमेश जगदाळे, पोशि/सचिन घुबडे, पोशि/माणिक दुधबळे, मपोहवा/लक्ष्मी बिश्वास, मपोना/सविता उसेंडी, चापोना/माणिक निसार, चापोना/मनोहर टोगरवार यांनी पार पाडली.