आरमोरी येथे मका खरेदी केंद्राचे तर कोरेगाव (चोप) इथे धान खरेदी केंद्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ.. 

ऋषी सहारे 

संपादक

आरमोरी: 

         आरमोरी येथे खरेदी विक्री समितीच्या माध्यमातून सन 2023 चा रब्बी हंगामात आरमोरी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना फेडरेशनच्या माध्यमातून विक्री करण्याकरिता आज दिनांक 29 मे रोजी आदिवासी फेडरेशन विभागाच्या गोडाऊनमध्ये मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्राची लोकप्रिय आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. 

       तालुक्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने सदर मका हा खरेदी विक्री समितीच्या माध्यमातून फेडरेशन विभागाला विक्री करण्यात येतो आणि दरवर्षी हा विक्री केलेला मका शासनाकडे पाठवलेला जातो. या मका उत्पादक शेतकऱ्यांना मका विक्रीचे केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी खरेदी विक्री समितीने पुढाकार घेतला असून, आज दिनांक 29 मे 2023 रोजी याचा शुभारंभ तहसील कार्यालयात जवळील आदिवासी विकास विभागाचा गोडाऊन येथे शुभारंभ करण्यात आला. 

       या शुभारंभ प्रसंगी मका उत्पादक शंकरनगर येथील शेतकरी विष्णुपत गाईन यांचे मका केंद्रामध्ये प्रथमतः क्रमांक लागल्याने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  

     यावेळी उपस्थित आमदार कृष्णाजी गजबे, खरेदी-विक्री समितीचे अध्यक्ष मनोज मने, उपाध्यक्ष दीपक निंबेकर, संचालक बाजार समितीचे सभापती ईश्वर पासेवार, पुरवठा निरीक्षक खांडवे , खरेदी विक्री समितीचे व्यवस्थापक अक्षय माकडे, ग्रेडर सचिन फाये आणि इतर मका उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

     मका खरेदी केंद्र सुरू झाले त्याबद्द्ल आरमोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार महोदयाचे आभार मानले आहे तर

        राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या. चोप/कोरेगाव येथे धान खरेदी केंद्राचे शुभारंभ आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले. 

       यावेळी आमदार कृष्णा गजबे, राष्ट्रसंत अभिनव सेवा सहकारी खरेदीचे सचिव दिनेश कुर्जेकर, बोडदा येथील अरुण गायकवाड, मदन बनपुरकर बूथ प्रमुख, फुळबांधे बूथ प्रमख, खरेदी-विक्री सेवा संस्थेचे कर्मचारी वर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.