तालुका प्रतिनिधी सावली
लवकरच खरीप हंगामास सुरुवात होनार असुन सावली तालूक्यात शेतकऱ्यानी खरीप हंगामाचे पुर्वतयारीचे कामांना सुरुवात केलेली आहे.
त्यात शेताची जाळपोळ, बांध बंधिस्ती, शेताची हंगाम पर्व मशागत, बियाणे व खतांचे नियोजन इत्यादी कामे शेतकरी नियमीत पारंपारीक पध्दतीने करीत असतांत.
त्यास तांत्रिक पध्दतीची जोड देण्याचे अनुषंगाने तालूका कृषि अधिकारी सावली यांचे वतीने संपुर्ण तालूक्यात विविध गावांतून खरीप हंगाम पुर्व शेतकरी प्रशिक्षणांचे अयोजन करण्यात येत आहेत.
त्याच अनुषंगाने मौजा जिबगाव येथे खरीप हंगामातील कामे व पर्यावरन पूरक जिवन पध्दती या विषयावर शेतकरी प्रशिक्षणाचे अयोजन नुकतेच करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी जिबगाव येथील सरपंच श्री पुरुषोत्त्म चुधरी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणूण दिनेश पानसे, कृषि पर्यवेक्षक तर परीसरातील प्रगत व यशश्वी फलोत्पादक शेतकरी श्री हरीदास मेश्राम हे प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिनेश पानसे यांनी प्रथम पर्यावरन पुर जिवन पध्ती व पर्यावरन पुरक शेती पध्दती या विषयाची माहीत देतांना सांगीतले की पर्यावरनावर कोनताती विपरीत परीनाम न हाउुन देता, पर्यावराणाचे रक्षण व संवर्धन करीत केल्या जानारी शेती व व्यतीत केलेले जिवन म्हणजेच पर्यावरण पुरक शेती व जिवन पध्दती असुन त्यासाठी अवलंबावयाचे पर्याय त्यांनी विषद केले.
त्यानंतर माती परीक्षण व एकात्मिक खत व्यवस्थापन, भात या खरीपातली मुख्य् पिकाचे लागवड तंत्र, भात पिकाचे एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, पौष्टीक तृणधान्य् लागवड व महत्व्, सेंद्रीय शेती, जैविक किड नियंत्रणात निंबोळी अर्काचा व दशपर्णी अर्काचा वापर तसेच 3 टक्के मिठाचे द्रावनाची व जिवानु संवर्धकांची बिज प्रक्रिया या विशयावर विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन करुन बिज प्रक्रिया व उगन क्षमता तपासणी प्रात्याक्षीक करुन दाखविले. तसेच कृषि विभागचे फळबाग लागवड, जलयुक्त् शिवार अभियान, सुक्ष्म् सिंचण योजना, पि.एम.एफ.एम.ई., नाडेप व गांडुळ खत युनिट, गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान, अहिल्यादेवी भाजीपाला रोपवाटीका, पॅक् हाउुस, बियाणे करीता व इतर कृषि औजारे करीता महाडीबीटीवर अर्ज करणे इत्यादी योजनांची माहीती दिली.
प्रसंगी अध्यक्षीय भाषनातुन सरपंच श्री पुरुषोत्त्म चुधरी यांनी शेतकऱ्यांनी नवनव्या लागवड व उत्पादन वाढीचे तंत्रज्ञानाचा अवलंब व पिक पध्दतीत फेरबदल तथा कृषि पुरक व्यवसाय केल्याशिवा शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती अश्यक्य असल्याचे मत वक्त् केले. कृषि सहाय्य्क श्री प्रदिप जोंधळे यांनी कार्यक्रमाचे संचाल करतांना प्रस्ताविक करुन तुती लागवड व रेशिम उदयोग योजनेची माहीती व किसान सन्मान योकरीता केवासी न झालेल्या शेतकऱ्यांची यादी अवगत करुन केवायसी करणेबाबत माहीती दिली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री पवन ठाकरे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशश्वितकरीता ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले. प्रसंगी बहुसंख्य् ग्रामस्थ् शेतकऱ्यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शनाचा लाभ घेतला.