खेड बाजार समितीत आमदार मोहिते पाटील यांच्या पॅनलचे बहुमत… — आमदार मोहिते यांचे प्रमुख शिलेदार माजी सभापती कातोरे, होले, लोखंडे यांचा पराभव…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : खेड तालुक्यातील सहकारातील महत्वाची निवडणूक असलेली खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनलने १० जागा जिंकून बाजार समितीत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे पण स्वतः आमदार आणि पॅनलप्रमुख दिलीप मोहिते पाटील हे काठावर विजयी झाले आहे. तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे प्रमुख शिलेदार माजी सभापती विलास कातोरे, नवनाथ होले आणि राजाराम लोखंडे यांचा झालेला पराभव विचार करणारा आहे. सर्व पक्षीय श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलचे सहा उमेदवार विजयी झाले तसेच आडते व्यापारी मतदार संघातून दोन अपक्ष विजयी झाले, परिवर्तन पॅनलचे पॅनलप्रमुख अमोल पवार आणि माजी सभापती शिंदे गटाचे जिल्हाप्रमूख भगवान पोखरकर यांचा पराभव झाला. स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांचे बंधू माणिक गोरे हे आडते व्यापारी मतदार संघातून विजयी झाले.

 

भीमाशंकर शेतकरी सहकारी पॅनल कडून आ.दिलीप मोहिते, जयसिंग भोगाडे, विनोद टोपे, कैलास लिंभोरे, हनुमंत कड, विठ्ठल वनघरे, सयाजी मोहीते, कमल कड, रनजीत गाडे आणि अशोक राक्षे विजयी झाले. सर्व पक्षीय श्री भीमाशंकर शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनलचे सोमनाथ मुंगसे, अनुराग जैद, विजय शिंदे, क्रांती शिंदे, सागर मुर्हे आणि सुधीर भोमाळे विजयी झाले.

आडते व्यापारी मतदार संघातून अपक्ष माणिक गोरे आणि महींद्रा गोरे हे विजयी झाले. 

आमदार दिलीप मोहिते, अशोक राक्षे, विठ्ठल वनघरे, सयाजी मोहिते हे चार जन सोडता बाकी १४ जनांचा बाजार समितीत प्रथमच संचालक म्हणून समावेश झाला आहे.