युवासेनाद्वारा आयोजीत मॉक परीक्षेला 275 विद्यार्थ्याचा उत्सुर्फत प्रतिसाद… – अंकुश पाटील कावडकर जिल्हाप्रमुख यांचे आयोजन…  – परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेन वाटप…

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

       स्पर्धा परीक्षांसाठी बसणार्‍या विद्यार्थ्याकरीता युवासेना दर्यापुर विधानसभाद्वारा मॉक परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वर्ग 11 वी व 12 वी च्या 275 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. ही परीक्षा विनामुल्य होती. यामध्ये निट युजी,मेडिकल, सि इ टी अभियांत्रिकी,औषधी या परीक्षेचे पेपर दि. 29 मार्चला दर्यापूर येथिल रत्नाबाई राठी हायस्कुल येथे 10 ते 1 या वेळात घेण्यात आले.

        या परीक्षेकरीता आँनलाईन नोदणी विद्यार्थ्यानी केली होती.विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. परीक्षाचे आयोजन युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर यांनी केले होते.

         या परीक्षेमध्ये बसणार्‍या विद्यार्थ्याना शुभेच्छा देण्याकरीता सुधिर सुर्यवंशी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख अमरावती जिल्हा, दर्यापुर मतदार संघाचे आमदार गजानन लवटे, युवासेना जिल्हाप्रमुख अंकुश पाटील कावडकर, अरुण पाटील खारोडे जिल्हाप्रमुख शिवसहकार सेना, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अलका पारडे, युवती सेना जिल्हाप्रमुख प्रांजली कैलाश कुलट, बबनराव विल्हेकर शिवसेना विधानसभा संघटक, महेंद्र दिप्टे उपजिल्हाप्रमुख शिवसेना, युवासेना जिल्हा चिटणीस प्रतीक राऊत, युवासेना तालुकाप्रमुख सागर गिरे, विशु सावरकर तालुकाप्रमुख युवासेना अंजनगाव सुर्जी, शिवसेना दर्यापूर शहर प्रमुख गोपाल अग्रवाल, महेश पाटील खारोडे उपसभापती पं.स. अंजनगाव सुर्जी, सरपंच किशोर टाले, सरपंच मोहन बायस्कर, सरपंच विजय आढाऊ, सतीश साखरे, गुणवंत गावंडे, भास्कर धोटे, शरद आठवले, खंडू राऊत, पंकज राणे, पंकज रेखे, राजू मानकर, अमोल अरबट, नंदू पखाले, दीपक बगाडे, रुपेश मोरे, धनंजय पवार, प्रशांत ठाकूर, मोहन खरबडकर, निलेश होले, सुरज कैकाडी, शिवराज ठाकरे, आशिष लायडे, शुभम विल्हेकर, नितीन माहुरे, बादल सवयी, अमन पटेल, प्रवीण पाटोळे, करण चक्रे, राज गुजराती, निलेश ठाकरे, श्याम मिरगे, गणेश भगत तसेच शिवसेना युवासेना युवती सेना पदाधिकारी आणि शिवसैनिक यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रसाद बावणेर सर, कैलास कुलट सर, शुभम घाटे यांनी विशेष सहकार्य केले.

         रत्‍नाबाई राठी हायस्कूल दर्यापूरचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य या परीक्षे करिता लाभले.