
सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
जिल्हा चंद्रपूर अंतर्गत जवाहर नवोदय विद्यालय तळोधी बाळापुर येथील सन 2024- 25 या शैक्षणिक सत्राकरिता 18 जानेवारी 2025 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. इयत्ता सहावीच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये सावली तालुक्यातील एकूण 08 विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी पंचायत समिती सावलीचे तत्कालीन गटविकास अधिकारी माननीय मधुकर वासनिक साहेब सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. गोंदिया येथे कार्यरत असलेले यांच्या प्रेरणेतून उन्हाळ्यापासूनच Each one Teach One उपक्रमाची सुरुवात केली. आणि याच उपक्रमांतर्गत नवोदयला बसलेल्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरावर सराव पेपर तसेच शिक्षकांसाठी तालुकास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या. या सर्व कार्यशाळा व सराव पेपरचे आयोजन माननीय मोरेश्वर बोंडे साहेब गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सावली यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी पंचायत समितीचे विद्यमान गटविकास अधिकारी माननीय श्री. योगेश गाडे,. साहेब गटशिक्षणाधिकारी माननीय श्री. मोरेश्वर बोंडे साहेब, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती, समावेशित तज्ञ, विशेष शिक्षक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
निवड झालेले विद्यार्थी…
1. दिया विलास नागोसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करगाव..
2. हर्षा योगराज ठाकूर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोखाळा..
3. सुहानी सुधीर मडकाम, जिल्हा परिषदे प्राथमिक शाळा पेंढरी मक्ता..
4. समीक्षा दुधे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी..
5.आस्था प्रदीप सातपुते, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कापसी…
6. प्रगती वाढणकर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निफंद्रा…
7. अंशुल नेमेश्वर कोतपल्लीवार, विश्वशांती विद्यालय सावली…
8 . धनश्री आदर्श गेडाम, विश्वशांती विद्यालय सावली…
सदर परीक्षेकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित सावली यांनी सुद्धा सहकार्य केले.