उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागपुरात… — अ दर्जा प्राप्त जगप्रसिद्ध दिक्षा भुमिच्या विकासासाठी व सौंदर्यकरणासाठी २१ एकर जागा देण्याची बसपची मागणी….

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्याला नागपूरात येत आहेत.ते स्वंयसेवक संघाच्या स्मृती मंदिर स्थळी जाणार आहेत.

      यानंतर लगेचच दिक्षा येथे जाणार आहेत व तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधान निर्माता विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत.

              दिक्षाभूमी नागपूर

       यानंतर १० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिंगणा मार्गावरील माधव नेत्रालयाच्या प्रिमिअम केंद्राची पायाभरणी होणार आहे.त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

प्रधानमंत्र्यांना जागेबाबत बसपची मागणी…

        प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या ३० मार्चला नागपूरला येत आहेत.त्यांच्या नियोजित दौऱ्या नुसार ते नागपूर येथील जगप्रसिद्ध दिक्षा भुमीला भेट देणार आहेत.

       त्यांच्या दौरा लक्षात घेता बसप पदाधिकाऱ्यांनी दिक्षा भुमिच्या विकासासाठी व सौंदर्यकरणासाठी शेजारची २१ एकर जमीन देण्याची मागणी केली आहे.सदर १६ एकर जगा आरोग्य विभाग आहे तर ५ एकर जागा कापूस संशोधन केंद्राची आहे.