सम्यकदृष्टी, समताभाव आणि शत्रुत्व…

       विषमतावादी व्यवस्थेत आणि वातावरणात आपण आपले जीवन जगत असताना ,इतरांशी आणि नातेवाईकांशी व्यवहार करताना संघर्ष उद्भवत असतो,याचे कारण प्रत्येक माणूस आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सुखमय आनंदी जीवन जगण्यासाठी धडपडत असतो,या धडपडीत सत्य न्याय निती जोपासता येत नाही.प्रयत्न केला तरी ते शक्य नसते.कारण परिस्थितीच विषम असते.समतेचे वातावरण नसते.म्हणून संघर्ष निर्माण होतात,विषमतावादी व्यवस्थेत अहंकार गर्व मान माया लोभ द्वेष मत्सर क्रोध इत्यादी विकृतीचे गुणांना संधी असते,त्यामुळे त्यांची झपाट्याने वाढ होते.

           हे सारे विकार समतेच्या तत्त्वावर हावि होऊन बसतात,समतेचे तत्व म्हणजे प्रेम सहानुभूती सहकार मैत्री बंधुभाव स्वातंत्र्य न्याय एकता सत्य शांती अहिंसा परोपकार दया क्षमा शांती इत्यादी मानवी गुणावर ,म्हणजे संस्कृत गुणावर विकृत गुणाचा प्रभाव पडतो,विकृत गुनांचाच विजय होत असतो.

     निसर्गतः माणसात सद्गुण आणि दुर्गुनाची बीजे असतातच,परंतु सद्गुणांची वाढ होण्यासाठी समतेची भूमी (व्यवस्था) आणि वातावरण हवे.विषमतेच्या भूमीत,वातावरणात ,पाण्यात ,हवेत समतेची बीजे रुजने महाकठीण कर्म आहे.जसे की एखाद्या खडकावर एखादे झाड दिसावे तसे.

            मानव निर्मिती पासून ते आज पर्यंत मानवी इतिहासात समतेची व्यवस्था निर्माण करण्याचे काही स्फुटक प्रयत्न झाले,परंतु ते अयशस्वी झाले,त्याचे कारण व्यवस्था परिवर्तन हे संपूर्ण व्हावे लागते,काही देशात झाले तरी इतर देशात विषमतावादी अर्थरचाना ,विषमतावादी सामाजिक ,सांस्कृतिक ,राजकीय रचना असेल तर ते देश गप्प बसत नाहीत,या देशातील समता नष्ट करण्यासाठी सारे विषमतावादी देश एक होऊन आपली शक्ती पणास लावतात.कारण सरंजामशाही व भांडवलशाही टिकवण्यासाठी त्यांना असे करणे आवश्यक असते.

          म्हणून अशा देशांना साऱ्या देशात विषमता टिकविणे आवश्यक असते.ती टिकवण्यासाठी दारिद्रय दुःख अज्ञान या सोबतच महागाई बेकारी लुटपाट,शोषण,पिळवणूक , अंधश्रद्धा,धर्म देव आवश्यक असतो.कारण या सर्व गोष्टी विषमतेला पूरक असतात.

      असे जरी असले तरी,या विषमतेच्या वातावरणात ,ज्यांना परिवर्तन घडवायचे आहे,त्यांना सम्यक विचार,सम्यक दृष्टी,आणि समाताभाव ही नैतिक मूल्य जोपासतच समतावादी समाजाची रचना व्यवस्था वातावरण निर्माण करावे लागते.अर्थात यासाठी समतेचे शत्रूंना आपणास तोंड द्यावेच लागते.अशावेळी ट्यांचेशी सुद्धा विषमताभाव म्हणजे शत्रुत्व भाव न ठेवता समताभाव ठेऊनच कार्य करावे लागते,जसे गौतमबुद्ध,गांधी,आंबेडकर यांनी केले.

          समता आणि विषमतेच्या लढाईत आपले शत्रू आणि मित्र कोण याची पारख असलीच पाहिजे,पण व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू नसून विचार हा आपला शत्रू किंवा मित्र असतो.म्हणून विचार बदलण्यावर भर दिला पाहिजे.एकदा का आपल्या विरोधाकास सम्यक दृष्टी मिळाली,त्याचेत समातभाव निर्माण झाला,तर शत्रू सुध्धा मित्र बनू शकतो, वाट चुकलेले वाटेवर येऊ शकतात.

          अखेर माणूस हा माणूस आहे,तो जनावर किंवा पक्षी नाही,मानवास विचार करण्याची,विचारात बदल करण्याची व्यवस्था निसर्गतः आहेच.माणसाचे विचार बदलू शकतात.एकदा का विचार बदलले की,दृष्टी बदलते,दृष्टी बदलली की व्यवहार वागणे आचरण बदलते.म्हणून व्यक्ती व विचार परिवर्तन वर आपला विश्वास पाहिजे.लेनिन एक मोठा कारखानदार होता,त्यास मार्क्सचा विचार पटला,त्याने आपले कारखाने सरकारी मालकीचे करून टाकले,रशियात क्रांती केली,आंध्रातील चंद्रपुल्ला रेड्डी हे हजार एकराचे जमीनदार होते,त्यांनी भूमिहीनांना जमीन देऊन टाकली,विनोबा भावेनी मत परिवर्तन करून महाराष्ट्रातील शेकडो जमीनदार कडून हजारो एकर जमीन दान स्वरूपात घेऊन भूमिहीनांना वाटप केली.

         याचा अर्थ विषमतावादी म्हणजे विकृत विचार बदलू शकतात, म्हणून शत्रुमित्र अशी निवड जरूर करावी ,पण द्वेष मत्सर भाव न ठेवता ,समटभाव आणि सम्यक दृष्टी ठेवावी.आणि आपल्या विचाराच्या शत्रू सोबत साम दाम दंड भेद या सनदशीर मार्गाचा वापर करून त्यास वाटेवर आणावे.

          साम दाम दंड भेद हा प्रगतिशील मार्ग आहे,प्रगती पथ आहे,अर्थात या मार्गाचा उपयोग मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी आणि समतेचे वातावरण परिस्थिती व्यवस्था निर्माण करण्यासाठीच केला पाहिजे.विषमतेसाठी ,शोषण ,अन्याय साठी करता कामा नये.तसे झाले तर आपण विषमता कडे वाटचाल करीत आहोत,असा त्याचा अर्थ निघतो.

      आधी सम्यक विचाराची कास धरणे,सम्यक दृष्टी निर्माण करणे,आणि समता भाव बाळगणे याचा अर्थ विचार आणि भाव यावर सर्वकाही अवलंबून आहे.म्हणून विचार बदला,दृष्टी बदलेल,दृष्टी बदला भाव बदलतील.आणि शात्रुमित्र हा भेदभाव नाहिसा होईल.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

                फोन : 9420912209