चिमूरात माफीया राज सुरू,क्राईम वाढलय,सभ्य समाजमनाला क्राईम बनविण्यात आमदार आणि अधिकाऱ्यांची हतबलता कारणीभूत?रोजगार उपलब्ध करून देण्याचा आणि चिमूर जिल्हा करण्याचा दमही आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यात नाही… — आमदार आणि अधिकाऱ्यांना क्राईम तालुका म्हणून चिमूरची ओळख निर्माण करायची आहे काय? 

 रोखठोक…

प्रदीप रामटेके…

 मुख्य संपादक 

        एकेकाळी चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली क्रांती भुमी आहे असे जगात लौकिकास्तव बोलले जायचे.

          परंतु आज याच चिमूर क्रांती भुमिला क्राईम ने ग्रासले असून अवैध वाळू उत्खननातंर्गत आणि अल्कोहोलच्या भरमसाठ व्यवसायातंर्गत चिमूरात माफीया राज सुरु झाले आहे आणि आता चिमूर क्रांती भुमिची ओळख वाळू माफियांचा आणि अमाफ दारु विक्रीचा तालुका म्हणून प्रसिद्ध होवू लागला आहे,हा एक चिंतेचा व चिंतनाचा खूपच गंभीर विषय बनला आहे.

          आमदार किर्तीकुमार भांगडीया हे ११ वर्षांपासून चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून नेतृत्व करतात.पण त्यांच्यात तो दम दिसला नाही,”की,या विधानसभा मतदारसंघात ते बेरोजगारांसाठी रोजगारांच्या संध्या उपलब्ध करुन देतील.

          बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दिले होते.याचबरोबर चिमूर जिल्हा करण्याचे कामाला प्राधान्य देणार हे सुद्धा त्यांनी म्हटले होते.तद्वतच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले होते.

              पण,सर्व आश्वासनाकडे आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी पाठ फिरवली असून अवैध वाळू चोरीमुळे चिमूर तालुका हे माफियांचे मोठे क्षेत्र बनावे यासाठी अवैध वाळू उत्खननाला त्यांनी आपल्या मवाळ स्वभावा अंतर्गत चालना दिली असल्याचे जनमानसात बोलले जात आहे.

       तद्वतच वाळू माफियांवर तहसीलदार श्रिधर राजमाने आणि पोलिस अधिकारी आवश्यक कारवाई करीत नसल्याने अधिकाऱ्यांच्या मांडलिकत्व भुमिकांमुळे वाळू चोर दिमाखात फालतुगिरीची महिमामंडल मिरवत आहेत हे सुद्धा उघड झाले आहे.

            चिमूर तालुकातंर्गत दररोज शेकडो ट्रॅक्टर द्वारे वाळूचे अवैध उत्खनन सुरू असताना चिमूर तालुक्यातील शुक्राचार्य अधिकारी चूप बसले आहेत आणि वाळू चोरट्याविरुद्ध कारवाई न करण्याची अफाट शांतता त्यांच्या बेगळी कर्तव्यात कूटून-कूटून भरली असल्याचे उघड्या डोळ्यांनी चिमूर तालुक्यातील जनता बघत आहे.

         बेरोजगारांना रोजगाराच्या माध्यमातून रोजगार देऊ शकत नाही हे जेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी अवैध वाळू उत्खननाचे दारे खुली करून दिली असेच म्हणावे लागेल आणि याच वाळू उत्खननातंर्गत चिमूर तालुक्यात चोर माफीयांच्या अनेक टोळ्या तयार करण्यासाठी रान मोकळे करून दिले असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.

             आमदार किर्तीकुमार भांगडीया एक व्यवसायीक आणि करोडपती असल्याने ते बेरोजगारीची समस्या एका झटक्यात मिटतील अशी अपेक्षा चिमूरकरांना आणि चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना होती.

        पण,झाले उलटेच?त्यांनी चिमूर तालुक्यातील नागरिकांना मोठे व्यवसाय देण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीतील,स्व नातेवाईकांना (स्वतःच्या भावाला) व्यवसायात उतरवून चिमूर तालुक्यातील मुरुमासारख्या खनिज संपदेचे कायदेशीर व बेकायदेशीर उत्खनन करण्यासाठी पदाचे मोठे अभय दिले होते.

          याचबरोबर चिमूर – भिसी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी भरमसाठ मातीचा उपयोग केला गेला,जो नियमबाह्य होता.

        तद्वतच चारित्र्य संपन्न बनविणारा व शिलाला स्वतःच्या जिवनात वैचारिक मंथनातून प्रत्यक्ष उतरविणारा भगवा (काश्यप) वस्त्र आहे,या भगव्या वस्त्राला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या कार्यकाळा पासून छत्रपती शिवाजी महाराज ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्यकाळा पर्यंत जगात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे.

         राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध कार्यक्रमांत भगवी टोपी घालून संबोधन करणारे आमदार किर्तीकुमार भांगडीया हे चिमूर तालुका व्यसनमुक्त करतील व चिमूर तालुक्यातील सर्व अवैध व्यवसाय हद्दपार करतील असे चिमूर तालुक्यातील नागरिकांना वाटत होते.

        परंतु चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्या गेले.आजच्या स्थितीत चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध व्यवसाय जोरात सुरु आहेत.या अवैध व्यवसायाकडे त्यांनी स्वतः आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

       यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अपेक्षित असलेला समाज आणि समाजमन तयार करण्याची क्षमता सुध्दा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यात नाही हे अधोरेखित झाले आहे असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

          आमदार किर्तीकुमार भांगडीया हे व्यवसायीक डोक्याचे आहेत खरे,पण ते स्वतः पुरते,आणि स्वतःच्या फायद्यापुरतेच आहेत.स्वत:ची प्रगती करण्यासाठी चिमूर सोडून नागपूरला स्थलांतरित झाले आणि आता मुंबईला?

          भाजपा तसाही बोलले आश्वासने पुर्ण न करणारा पक्ष आहे व देशातील नागरिकांच्या विरोधात नियम बनविणारा पक्ष आहे.यामुळे स्वतःच्या फायद्यासाठी मतदारांना दिलेल्या आश्वासनांची त्यांना लागलिच भुलवन होते,हे भारतीय नागरिकांसह अख्या जगासमोर आले आहे.तसेही भाजपाला भुलवन होण्याचा मानसिक रोग जळला आहे आणि हा त्यांना लागलेला रोग भयंकर जुना असावा असे त्यांच्या कृतीतून दिसून येते आहे..

           चिमूर तालुकातंर्गत जोमाने वाढणारे अवैध व्यवसाय आणि या व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण होणारे माफिया,त्यांच्यावर न होणारी आवश्यक कारवाई,यामुळेच आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीत सभ्य व शांत समाजमनाची गरज नाही काय? हा प्रश्न सहाजिकच अनेक मुद्यांना पुढे आणतो आहे.

         समाजातील सर्व घटकांनी स्वतःच्या भावी पिढ्यांना बरबाद करायचे नसेल तर भाजपाला सहकार्य करणे अधिकच गंभीर आहे हे ओळखण्यासाठी वैचारिक क्षमता निर्माण केली पाहिजे आणि अवैध व्यवसायांवर वेळीच चिंताग्रस्त होत मंथन केले पाहिजे.