दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील रेती तस्कर वेगवेगळ्या योजना आखून अवैध गौण खनिज विना परवानगी ने उपसा करत आहे.
गौण खनिजाची तस्करी करताना कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडू नये व होणाऱ्या कारवाही पासून वाचण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली वर लक्ष ठेवाण्यासाठी टप्प्या टप्प्यावर आपले गुप्तचर ठेवत असतात.त्यामुळे रेती तस्कर रात्री किंवा पहाटेच्या सुमारास नदी पात्रामधून बेकायदेशीर मागनि करीत असतात.
या अवैध गौण खनिज तस्करांच्या मुसक्या आवळन्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा पूर्ण पणे तयारीला लागले आहेत.
पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी आपले सहकारी विनोद बावणे यांच्या सोबत सकाळच्या वेळी पट्रोलिंग दरम्यान मौजा विरव्हा गावातील नदी पात्रता नंबर नसलेले ट्रॅक्टर विना परवानगीने रेतीचा उपसा करीत असल्याचे त्यांना आढळून आले.पण पोलीस कर्मचारी दिसताच ट्रॅक्टर चालक व मजूर ट्रॅक्टर नदी पात्रतच ठेऊन पळाले.
फिर्यादी स. फौ. विनोद बावणे ब.नं.१८९९ पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या तक्रारी वरून अज्ञात वाहन चालक मालक यांच्या विरोधात सिंदेवाही पोलीस स्टेशनला गुन्हा अप-१५३/२०२४ कलम ३७९ भा. द.वी. कलम ५५/१७७ दाखल केला असून वाळू किंमत एक ब्रास ५ हजार रु व ट्रॅक्टर किंमत १० लाख ५ हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त केला असून पोलीस प्रशासनच्या धडक कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये धडकी भरली आहे.