वनविभागाने हत्तीचा बंदोबस्त न केल्यास.. — आठ दिवसात कारवाई न झाल्यास रास्ता रोको व आमरण उपोषण करण्याचा निवेदनाद्वारे दिला इशारा…

ऋषी सहारे

   संपादक

देसाईगंज – आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील पाथरगोटा, पळसगाव, शंकरनगर, जोगीसाखरा, डोंगरगाव,चिखली या गावामध्ये मागील सहा महिन्यापासून हत्तींच्या कळपाने हैदोस मांडलेला आहे.

         यामध्ये काही लोकांची जीवित हानी, काही लोकांची घरांची नुकसान व बऱ्याचस्या शेतक-यांचे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे व वन विभागाकडून फक्त हत्तीचा लोकेशन सांगितल्या जाते परंतु त्यांच्यावर नियंत्रण केल्या जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकरी यांना आपला जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे.

         आता अवघ्या 15 दिवसात मोह फुल वेचणे व तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरु होणार आहे अश्या परिस्थितीत जर एखाद्याच्या जीवाला धोका झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी वनविभागाची राहील.

        श्यामाप्रसाद मुखर्जी सोलर कुंपण योजने अंतर्गत शेतक-यांकडून सातबारा वेळोवेळी मागूनही लाभ मिळालेला नाही. हत्तीच्या हैदोसामुळे शाळकरी मुलांना सुद्धा धास्ती भरली आहे. वन विभागाकडून शेतपिकांचे पंचनामे करतांना काटकसर केली जाते व विलंब केल्या जाते त्यामुळे नुकासानिनुसार लाभ मिळत नाही.

         या सर्व बार्बीचा अति तात्काळ कार्यवाही न झाल्यास 8 दिवसात आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असे या निवेदनाद्वारे कळविण्यात आले असल्याचे समजते.