उमेश कांबळे
तालुका प्रतिनिधी भद्रावती
सध्या शहरात गल्लो गली अवैध गावठी दारूची विक्री फोफावत असुन या गावठी दारू विक्रीला कायम स्वरूपी आळा घाला या बाबतचे निवेदन ठाणेदार बिपिन इंगळे याना भारतीय राष्ट्रीय शहर काँग्रेस भद्रावती तर्फे देण्यात आले आहे.
बेरोजगार तरूण वर्ग या गावठी दारुच्या आहारी जावून आपले संसार उध्वस्त करीत आहे, कित्येक लोकांचे जीव गेले. ही बनावटी गावठी अवैध दारू विकाणाऱ्यांवर कारवाई करून आळा घालावे या आशयाचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भद्रावती तर्फे देण्यात आले.
सदर निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय शहर काँग्रेसचे उपशहर प्रमुख संदीप कुमरे यांचे नेतृत्वात रितेश वाढई, सचिन पचारे, पिंटू मरस्कोल्हे, महेश कोथडे आदि उपस्थित होते.