ग्रामविकास विद्यालय पाटाला येथे प्रजासत्ताक दिन साजरा

शुभम गजभिये 

  विशेष प्रतिनिधी 

        ग्राम विकास विद्यालय,पाटाळा शाळेच्या भव्य पटांगणात 76 वा गणराज्य दिन श्री.श्यामसुंदर बळीराम पोडे,साहेब, स्वायत्त बहूउद्देशीय शिक्षण संस्था ,चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

          या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून लाभलेले पाटाळा गावचे प्रथम नागरिक श्री. विजेंद्र वानखेडे,श्री. गमे पाटील,श्री.बंडूभाऊ पोटे उपस्थित होते.

          माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2024 मध्ये प्रथम ,द्वितीय तथा तिसरा क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्व.श्री मधुकरराव पोटे आणि स्व.श्रीमती इंदिराबाई मधुकरराव पोटे यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ ,स्म्रुतीचिन्ह आणि रोख रक्कम देवून गौरव करण्यात आला.

          तसेच स्व.अजयकुमार श्यामसुंदर पोडे यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ श्रीमती संध्याताई अजय पोडे यांच्या कडून रोख रक्कम देवून गौरव करण्यात आला.

           त्याच प्रमाणे स्व.रामचंद्र पैकाजी आवारी यांच्या स्म्रुतीप्रित्यर्थ शाळेचे मुख्याध्यापक, श्री.वामन रामचंद्र आवारीसर यांच्या कडून रोख रक्कम देवून विद्यार्थ्यांचा गैरव करण्यात आला. 

        या कार्यक्रमाला पाटाळा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन ग्राम विकास विद्यालयातील शिक्षिका कु.मुद्दलवार मॅडम यांनी केले तर बक्षीस वितरणाचे संचालन शाळेतील गणित विषयाचे शिक्षक श्री. हरणेसर यांनी केले.आभार प्रदर्शन शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक श्री.झाडे सर यांनी केले.

          या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.