
पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :-
मानवी जीवनात एकदा राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान आपल्याला मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असली तरी हा मान सहजासहजी कुणाला मिळत नाही. मात्र देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतीमध्ये प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकविण्याचा मान बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनीला देऊन एक पायंडा रचला. सौ. सरपंच प्रभा ढोरे यांनी पुढाकार घेत आपल्या अधिकाराचा त्याग करीत गावातील इतर विद्यार्थ्यांना व युवा वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून हि एक नवी सुरवात केली आहे.
प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर, शैक्षणिक संस्थांचे वरिष्ठ किवा विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधीना ध्वजारोहन करण्याचा मान मिळतो यामुळे प्रत्येकाला राष्ट्रध्वज फडकविण्याचा स्वप्न पूर्ण करता येत नाही. गावातील राजकीय पुढारी गटातटाचे राजकारण करून पाय खिचण्याचे प्रकार सुरूच आहेत. मात्र हे सर्व बाजूला सारून सरपंच प्रभा ढोरे यांनी पुढाकार घेत गावातील फेब्रुवारी २०२४ मध्ये बारावीच्या परीक्षेत गावातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने साक्षी शिवलाल डुंबे या विद्यार्थिनीला हस्ते ध्वजारोहन करण्याचा मान देण्यात आला.
जीवनात यश संपादन करावे या उद्दात्त हेतूने साक्षी च्या हातून ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच सुमंत मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य राजू कुरेशी, रजनीकांत गुरनुले, देवानंद बनसोन ग्रामपंचायत सदस्या शालिनी मेश्राम, मीराबाई पेलने, नैना सहारे, पोलीस पाटील सुधीर पेलने, ग्रामविकास अधिकारी लांजेवार, ग्रामपंचायत कर्मचारी योगेश ढोरे, अश्पाक सय्यद, शामराव अलोने, भिवा पेलने, नरदेश डोंगरे, प्रमोद सहारे, सोमेश्वर अलोने, सावंगी येथील शाळेचे शिक्षकवृंद अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ यांच्या उपस्थिती ध्वजारोहन करण्यात आले.
सरपंच प्रभा ढोरे यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.