
RSS / मोहन भागवत / नॉन बायलॉजिकल प्राणी आणि त्यांचे EVM मंत्रिमंडळ / तडीपार / मुख्यमंत्री फसणवीस आणि त्यांचे EVM मंत्रीमंडळ हेच देश,लोकशाही आणि संविधानाचे मारेकरी….
आणि…..
वरील सर्व कुटनीतीचा अन्याय सहन करुन जगता – जगता मरणारी व मरता – मरता जगण्याचा प्रयत्न करणारी भारतीय जनता म्हणजे…
चालणारे जिवंत मुडदे होत…”या सर्वांमध्ये लेखक पहिला….
कारण….
आमच्या देशातील सर्वच महापुरुषांनी एक फार मोठी चूक केली आहे की या देशातील जनतेची मानसिकता ही कधीच विज्ञानवादी + विवेकवादी अर्थात मानवतावादी होऊच शकत नाही. हे न ओळखण्याची फार मोठी चूक केली.
आम्हाला दुसऱ्याचा विचार न करता,स्वतःच्या स्वार्थासाठी कसं जगता येईल,भलेही दुसऱ्यांचे कितीही वाईट झाले तरी चालेल.त्यासाठी देश, समाज,संस्कृती,इ.अभिवचने धुळीस मिळाले तरी चालतील.परंतू,माझा स्वार्थ कसा साधता येईल यासाठीच जगण्याची जी स्पर्धा या देशात निर्माण झाली ती केवळ आणि केवळ या बाहेरून आलेल्या आर्यांची देण आहे, अर्थात आताच्या या RSS ची!
या देशाचा आर्याच्या अर्थात RSS च्या मानसिक गुलामीचा इतिहास आहे.तो जवळपास पाऊणेचार हजार वर्षांचा आहे. आणि हा गुलामीचा इतिहास सार्वजनिक रूपाने पुसून टाकण्याचा प्रयत्न बोटावर मोजण्याइतक्या क्रांतीकारक व महापुरुषांचा आहे.तो गुलामीचा काळा इतिहास कायमचा नष्ट करण्याचा प्रयत्न जरी संविधान क्रांतीतून झालेला असला असा भास वाटत असला तरी मूळ कुसंस्कृती रुजलेली असल्यामुळे अवघ्या 75 वर्षात ती मुळासहित उखडून कशी जाईल?
येथील कुसांस्कृतिक गुलामीच्या नशेचा जर आम्हाला गर्व झालेला असेल तर…
संविधान,लोकशाही,देश,महापुरुष आणि त्यांच्या क्रांत्या,त्याग,संघर्ष,बलिदान या सर्व बाबी आमच्यासाठी मनोरंजनाचा विषयच होऊन बसणार ना!
गेल्या 75 वर्षातील लाखो उदाहरणे त्यासाठी देता येतील.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आता राहिले नाही ते दूध आता तीच्या मावशीचे झाल्यामुळे मांजरी इतकेच आम्ही शेपूट घालून वाटीतल्या दुधासाठी गुरगुरतोय……
आज 2025 च्या काळात संपूर्ण देशात आणि पुरोगामी ( केवळ नावालाच ) महाराष्ट्रात जी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक,आर्थिक, इत्यादी क्षेत्रात पीछेहाट झाली ती केवळ आणि केवळ साम,दाम,दंड आणि भेदाच्या कुटनीतीचा घराघरात झालेला शिरकाव.
आमच्या मेंदूला सम्यक विचार करण्यास व्यवस्थेने वाव निर्माण करु न देण्यासाठी आणि त्यातून जागृत आपण कधीच होऊ नये यासाठीच सर्वकाही व्यवस्था व्यवस्थित केल्यामुळे आज आमची ही अवस्था झाली.
केवळ आणि केवळ महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या क्रांतीचा इतिहास काळात दडपवण्यासाठीच घरात त्यांचे फोटो,प्रतिमा,चौकात स्मारके,पुतळे निर्माण करणे यांच्याशीवाय आमची मजल जात नाही.कोणत्याही महापुरुषांचे स्वप्न कधीच नव्हते की माझे पुतळे उभारावेत आणि माझी पूजा करावी.परंतू ,त्यांच्या क्रांतीचा आदर्श आचरणातून सिद्ध न करता आंधळ्या विभूतीपूजेत त्याचे रूपांतर आम्ही करुन त्यांची नपुसंक लेकरं आम्ही निपजलो!
हे सर्वकाही जे 2025 मध्ये घडत आहे.ते सर्वकाही येथील लोकशाहीच्या आणि संविधानाच्या नावावर निर्माण झालेल्या कूटनितीच्या घुसखोरीमुळेच.त्याला सर्वस्वी जबाबदार केवळ आणि केवळ वरील शीर्षकातील व्यवस्था आणि व्यक्तीच जबाबदार आहेत.
RSS ही आर्यांची कूटनितीची मनुस्मृतीवर आधारलेली कुसंस्कृती आहे. म्हणूनच ती जबाबदार…
मोहन भागवत ही व्यक्ती नसून वृत्ती आहे….
नॉनबायलॉजीकल प्राणी म्हणजे खोटारडा,अज्ञानी,फसवा,स्वतःची पत्नी नाकारणारा,या देशाचा प्रधानमंत्री…..
देशाच्या केंद्रीय मंत्रीमंडळाचा जन्म एका EVM आणि VVPAT च्या गर्भातून झालेला…..
ज्याच्यावर सोराबुद्दीन आणि ज.लोया यांच्या खुनाचा आरोप असून तेंव्हा तडीपार झालेला गुन्हेगार या भारताचा गृहमंत्री दोनवेळा बनतो…..
याच पुरोगामी महाराष्ट्रात सुद्धा जनतेला सावध करुन सांगतो की,मी एक वेळ अविवाहित राहील परंतू राष्ट्रवादीसोबत जाणार नाही,असा तीन वेळा ओरडून सांगणारा फसणवीस, छत्तीसगड पॅटर्न (EVM वर निवडणुका जिंकण्याचे षडयंत्र ) त्यानंतर हरियाणापॅटर्न राबवला.तोच पॅटर्न राबवण्याची घोषणा करणारा व अमलात आणनारा आताचा EVM मुख्यमंत्री आणि त्याचे मंत्रीमंडळ. म्हणजे देवेंद्र फसणवीस आहे…
आणि हे सर्व घडत असतांना केवळ बघ्याची भूमिका घेणारा आणि व्यवस्थेचा गुलाम झालेला आमच्या पुरोगामी महाराष्ट्राचा स्वतः सुशिक्षित, प्राध्यापक,डॉक्टर समजणारा षंढ,नपुसंक,बुद्धीजीवीवर्ग……..
म्हणूनच आमचा देश,जागतिक लोकशाही आणि संस्कृतीच्या तुलनेत गेल्या 2014 पासून प्रवाहाच्या बाहेर फेकल्या गेला.
देशावर आणि सर्वच राज्यांवर कर्जाचा माऊंट एव्हरेस्ट…
महागाई आणि बेरोजगारीचा भस्मासूर…..
परिणामी जगण्याच्या धडपडीतून निर्माण होणारी देशांतर्गत अराजक्ता आणि शेतकरी आत्महत्या…..
वरील सर्व परिणामांचा अतिरेक होऊन कदाचित एक दिवस जर व्यवस्थाच मोडीत निघालीच तर आश्चर्य वाटायला नको.
म्हणूनच…
त्या सर्वाना जबाबदार केवळ आणि केवळ वरील शीर्षकातील व्यवस्थाच या देशाचे, लोकशाहीचे आणि संविधानाचे मारेकरी आहेत..
जागृतीचा कृतिशील लेखक
अनंत केरबाजी भवरे
संविधान विश्लेषक,रेणापूरकर, औरंगाबाद,7875452689…