प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा महाशिवरात्री निमित्त येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री श्रेत्र भंडारेश्वर देवस्थान येथे यात्रेनिमित्त सर्वसाधारण आढावा बैठक दि. २९ जानेवारी रोजी दुपारी ग्रामपंचायत येथे घेण्यात आली.
ग्रामपंचायत आणि श्री श्रेत्र भंडारेश्वर देवस्थान समिती यांच्या मार्फतीने श्री श्रेत्र भंडारेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्त यात्रेचे आयोजन करण्यात येते. यात्रा नियोजना करिता सर्वसाधारण आढावा बैठक घेऊन नियोजन करण्यात आले. सभेत दि. १७ फेब्रु. ते १९ फेब्रु. पर्यंत तीन दिवसीय यात्रा करण्याचे ठरविण्यात आले. यात्रेत घटस्थापना, महापूजा, अभिषेक, हवन, उपवासाचा नाष्टा, आरती-भजन-किर्तन, भक्तीपर प्रबोधन कार्यक्रम, काला, महाप्रसाद तसेच टिपूर जाळून यात्रेची सांगता करण्यात येण्याचे सभेत ठराव घेण्यात आले. येथील दर गुरूवारी असणारा आठवडी बाजार यात्रेनिमित्त दि. १९ फेब्रु. रोजी रविवारी भंडारेश्वर देवस्थान परिसरात भरविण्यात येईल. तसेच रात्रौ तीन अंकी नाट्य प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
सभेत ग्रामपंचायत सरपंचा संगीता पेंदाम, उपसरपंच भास्कर बोडणे, सदस्य सत्यदास आत्राम, आदेश आकरे, दिपाली ढेंगरे, भंडारेश्वर देवस्थान समिती अध्यक्ष बालाजी पोफळी, उपाध्यक्ष महादेव दुमाने, सदस्य डोनु कांबळे, केशव गेडाम, दिनकर लोथे, प्रलय सहारे, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव धनकर, पोलिस पाटील गोरख भानारकर, प्रा. प्रदिप बोडणे, हरेद्र मानकर आणि मोरेश्वर पगाडे उपस्थित होते.
सभेत मागील सभेचा वृत्तांकन आणि जमा खर्चाचा विवरण भंडारेश्वर देवस्थान समिती सचिव विश्वनाथ ढेंगरे यांनी वाचन केले आणि उपस्थितांचे आभार नेताजी बोडणे सर यांनी मानले.