ऋषी सहारे
संपादक
कुरखेड्या तालुक्यातील मौजा अंगारा येथे फेब्रुवारी महिन्यात ग्रामसभेची बैठक झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप ग्रामसभा बैठक आयोजित करण्यात आली नाही. 15 ऑगस्ट रोजी नियोजित ग्रामसभा बैठक होणे अपेक्षित होते मात्र त्यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांनी दुर्लक्ष करून ग्रामसभा घेतली नाही.
20 डिसेंबरला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते पण ग्रामसभे मध्ये लोकसंख्या खूप कमी असल्यामुळे ग्रामसभा रद्द झाली, सात दिवसाच्या आत ग्रामसभा घेणे अनिवार्य असते पण ती ग्रामसभा घेण्यात आली नाही आज आठवा दिवस तरीपण ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच ग्रामसेवक सर्वांचे याकडे दुर्लक्ष आहे त्यामुळे गावातील काही समस्या, प्रश्न, गावातील विकासकामे, जमा खर्च यावर चर्चा झाली नाही. यामुळे गावकरी त्रस्त असून प्रचंड आक्षेप घेत आहेत.
सदर बाबीची दखल घेऊन आजाद समाज पार्टीचे कुरखेडा तालुकाध्यक्ष सावन चिकराम यांनी 04 ऑक्टोबर रोजी सरपंचांना निवेदन सादर केले होते. परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने सावन चिकराम व गावाकऱ्यांनी यावर वरिष्ठ स्तरावर तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.