“प्राइड ऑफ महाराष्ट्र”मध्ये टेकाडी ग्राम पंचायत ची सदस्या सौ.पायल आशिष झोड अव्वल.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवणी

 कन्हान : – नागपुरात झालेल्या ‘ मदर अँड डॉटर ग्रुप ऑफ प्राईड ऑफ महाराष्ट्र सीझन टु २०२३’ मध्ये टेकाडी ग्राम पंचायत सदस्या आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्त्या पायल आशिष झोड आणि त्यांची मुलगी कुमारी अरिषा आशिष झोड यांनी प्रथम क्रमांक पटकावित अव्वल आल्याने आयोजक मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक ट्रॉफी आणि मुकुट देऊन गौरविण्यात आले.  

           आई आणि कन्या गटात एकुण ५५ जोडप्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये कन्हान परिसरातील टेकाडी येथील रहिवासी पायल व तिची मुलगी यांनी विजेतेपद पटकावण्याचा मान मिळविला.

        स्पर्धा पूनम प्रोडक्शंन निदेशक/ संयोजक पूनम गोकुळपुरे, ल तेश्वरी काळे, ललित धारोडे, अँड. ऋचा अरोरा आदीच्या प्रमुख आयोजकच्या उपस्थितीत मराठी चित्रपट अभिनेत्री सोनल नायक आणि मिस युनिव्हर्स झोया शेख यांनी पायल व तिच्या मुली ला ट्रॉफी प्रदान करित विजेत्यांना मुकुट घालुन गौरविण्यात आले.

           दोन्ही विजेत्यांचे वडील पृथ्वीराज मेश्राम, आई सुनीता मेश्राम, गट सदस्य मीना झोड सह टेकाडी गावातील नागरिकानी तसेच ग्राम पंचायत टेकारी येथे सर्वानी आदींनी अभिनंदन केले.