दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
जनतेनी जनआंदोलन हा पर्याय वापरावा,कारण जनतेपुढे सरकार झुकते हे निश्चित.
या बीजेपी सरकारच्या काळात आपण जर बघितले तर शेतकऱ्यांनी केलेल्या दिर्घकाळ आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या विरोधातले काळे कायदे रद्द करावे लागले.
त्यानंतर जनआंदोलनामुळे भारत सरकारला ब्रिजभूषण प्रणित निवड झालेली समिती बरखास्त करावी लागली.
गावागावात रथ फिरवून सरकारचा पैसा खर्च करून स्वतःचा प्रचार करणाराण्यांना जनतेने गावातून वापस पाठवले.
महाराष्ट्रात कंत्राटीकरण रद्द करावे लागले.यावरून आपणास असे लक्षात येईल की जनता हेच मोठं शस्त्र आहे. त्यांच्या पुढे कोणीही टिकू शकत नाही.
आता वेळ आली ईव्हीएम हटावची.प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून,प्रत्येक राज्यातून आणि संपुर्ण देशातून याविरोधात फार मोठं आंदोलन उभं करणं गरजेचं आहे.
त्यानंतर खाजगीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे.आपण सर्वत्र आंदोलने,मोर्चे काढून तथा संसदेवर मोर्चा काढून यावर पर्याय देवू शकतो.जे सरकार जनतेचे ऐकत नाही त्या सरकारला सतेवर रहाण्याचा अधिकारच नाही.
म्हणून सर्वांनी सावध व्हावे.आता सर्वांना रस्त्यावरची लढाई जिंकायची आहे.
ईव्हीएम,खाजगीकरण,संविधान या मुद्यावर राष्ट्रीय संविधान बचाव अभियान मोर्चे,आंदोलने,उपोषण यावर जोमाने काम करण्यावर भर देण्यास सुरुवात होत आहे.
हे सर्व देशात ऐकाच वेळी सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, राज्यातून व देशातून चालू करण्याचा मानस आहे तर सर्वांची साथ आवश्यक आहे.
त्यासाठी सर्व संघटनांनी व विरोधी पक्षांनी साथ द्यावी आणि आता मी जेल मध्ये रहाणे पसंद करतो.कारण मला गुलामीचे जेल नको असी जनआंदोलन करण्यासाठी भावना मनात रुजविणे आवश्यक आहे.
ज्ञही सुरुवात मी माझ्यापासून करतो.त्याच पद्धतीने प्रत्येकाने असाच निश्चय करावा अशी विनंती प्रा.देविदास इंगळे यांनी केली आहे.
“साथ दया-साथ घ्या, गुलामी टाळा.असे आव्हान सुध्दा प्रा.देवीदास इंगळे यांनी केले आहे.
त्यांचा संपर्क क्रमांक:- ७५०७४६३२७८