दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : येथील इंद्रायणी सेवा फौंडेशनच्या वतीने इंद्रायणी नदी माता परिक्रमा पालखी सोहळ्याचे प्रवर्तक हभप गजानन महाराज लाहूडकर यांना इंद्रायणी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
आळंदी नगरपरिषदेचे माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर व इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्या हस्ते व माजी नगरसेविका मालनताई घुंडरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लाहुडकर महाराज यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शिरीषकुमार कारेकर, जनार्दन पितळे, डॉ.सुनील वाघमारे, अरुण बडगुजर, राजु महाराज दिवाने, सागर महाराज लाहूडकर, सुनील घुंडरे, गणेश गरुड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, पुरुषोत्तम महाराज हिंगणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
गजानन महाराज लाहूडकर यांनी नुकतेच २०० वारकऱ्यांना सोबत घेऊन इंद्रायणी नदी परिक्रमा पालखी सोहळा आयोजीत करण्यात आला होता यामध्ये त्यांनी इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी समाज प्रबोधन करुन नागरीकांना इंद्रायणी नदीचे महत्त्व समजून सांगितले त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून त्यांना इंद्रायणी सेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असल्याचे सेक्रेटरी डॉ.सुनील वाघमारे यांनी सांगितले आहे.