नीरा नरसिंहपुर दिनांक: 28
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
बावडा ते नरसिंहपुर परिसरात सर्व भागातील ट्रॅक्टर मालक व ऊसतोड मजुरांची व ऊस तोडनि व भरणी साठी लगबग चालू आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अनेक साखर कारखान्यांना ऊस सालाबाद प्रमाणे जात आहे. माढा साखर कारखाना,, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना,, बारामती अग्रो साखर कारखाना,, नीरा भीमा साखर कारखाना,, माळी शुगर फॅक्टरी माळीनगर,, कर्मयोगी साखर कारखाना,,या सर्व साखर कारखान्याच्या ऊसतोड मजुरांची व ट्रॅक्टर मालक टोळ्या शेकडो आसल्याने ऊस तोडणी व वाहतुकी साठी चांगलाच वेग लागला आहे. नरसिंहपुर, गिरवी, टणु , पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, गोंदी, ओझरे, बावडा, सराटी, लिंबोडी, लुमेवाडी, ही सर्व गावे नीरा-व भीमा नद्यांच्या पट्ट्यातील आसल्याने ऊस पिके भरपूर आणि जोमात आहेत. प्रत्येक गावोगावी साठ टक्के प्रमाणात ऊस तोडणी झालेली आहे. आजून मोठ्या प्रमाणात उसाची पिके जास्त आसल्याने ऊस तोडणीच्या कामाला वेग आलेला आहे. गिरवी येथील ट्रॅक्टर मालक प्रकाश कोकाटे हा गेली तीन वर्षापासून ऊसतोड मजूर व ट्रॅक्टर सहित टोळी सांभाळून प्रामाणिक पणे निरा भीमा साखर कारखान्याला ऊस तोडणी करीत आहे. तीन वर्षापासून या व्यवसायात आठ ते नऊ हजार टन ऊस गाळपासाठी वाहतूक करून निरा भिमा कारखान्याकडे पोच केलेला आहे. नेहमीच प्रामाणिक पणे प्रकाश कोकाटे टोळी सांभाळून ऊस तोडणी करण्यासाठी कसरत करतात हे यातून गिरवी येथील प्रगतशील बागायतदार प्रकाश कोकाटे यांनी दाखवून दिले.