नीरा नरसिंहपूर दि.28
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
पिंपरी बुद्रुक येथील प्रसाद रामा वाघमारे याचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय अकरा वर्षाचे होते. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ असा परिवार आहे. आशासेविका सारीका वाघमारे यांचा मुलगा तर माजी उपसरपंच बाबा गायकवाड यांचा भाचा होता. प्रसादला ह्रदयाशी संबंधी आजाराने अनेक दिवसांपासून ग्रासले होते. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.