कमलसिंह यादव
प्रतिनिधी
पारशिवनी:-पारशिवनी पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा नयाकुंड शिवार येथे काही आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीला हातबुक्याने मारहण करुन तिचा विनयभंग केल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टेला पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार
दिनांक २३ डिसेंबरला रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान फिर्यादी व आरोपी १) मिरा मनोहर काळसर्पे २) लता काळसर्पे ३) मनोहर काळसर्पे ४) पुजा काळसर्पे सर्व रा.नयाकुंड हे एकाच मोहल्यात अमोरा-समोरील घरात राहत असुन फिर्यादीची जाऊ नामे उषा ठाकरे हिच्या सोबत मिरा काळसर्पे ही पैश्याचा कारणा वरुन झगडा भांडण करत असतांना फिर्यादीने जाऊला कशाला भांडण करत आहे घरी चला असे म्हटले असता आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवुन फिर्यादीचे केस धरुण अश्लील भाषेत शिविगाळ करून हातबुक्कीने मारपीट करुन फिर्यादीची तिला लज्जास्पद वाटेल असे वर्तन करुन विनयभंग केल्याने पारशिवनी पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून पोस्टे ला सर्व आरोपी विरुद्ध कलम १४३ , १४७ , १४९ , २९४ , ३५४ , ३२३ , ५०६ भांदवि सह कलम १३५ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास….
पोलिस निरिक्षक यांचा मार्गदर्शनात पोलीस उप निरीक्षक ज्ञानबा पळनाटे हे पुढील तपास करीत आहे.