मेंढा टोला गावातील नाल्या पूर्णपणे तुंबलेल्या… — नालीचं पाणी जाते घरात… — ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

         सातगाव पासून सात किलोमीटर अंतरावर असलेला ग्रामपंचायत मेंढटोला यात गट ग्रामपंचायत म्हणून गट्टे पहिली या गावाचा समावेश होतो असे दोन गाव मिळून मेंढाटोला ग्रामपंचायत निर्माण झाली आहे.

         दोन्ही गाव मिळून ज्या गावाची लोकसंख्या जवळपास बाराशे ते पंधराशे आसपास आहे मिनिटाला या गावात सिमेंटचे आहे तयार झाली आहेत. काँक्रीट रोड तयार झाल्यामुळे नाल्या खाली गेल्या रोड उंचावर नालीखाली यामुळे नाली आणि त्यामुळे नाली नालीचं पाणी पावसामध्ये दिलीप ठाकूर पांडुरंग ठाकूर प्रकाश ठाकूर दीपक मसराम व इतर लोकांच्या घरामध्ये पावसाळ्यामध्ये नालीचा उपसा न केल्यामुळे नालीतून पाणी न जाता नालीच पाणी नालीच्या वरून जाते आणि ते पाणी सर्व घरांमध्ये घुसते असे नागरिकांनी सांगितले.

          नाल्यातील गाळ उपसा न केल्यामुळे याचा त्रास नागरिकांना होताना दिसून येते पाणी एका ठिकाणी साचल्यामुळे त्या ठिकाणी डास मच्छर याची उत्पत्ती होऊन रोगराई निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.

         त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे नागरिकांचा ग्रामपंचायत प्रशासना विरोधात रोष व्यक्त केला हे आप बीती नागरिकांनी प्रतिनिधीला सांगितले मेंढाटोला गावातील नाल्या पूर्णपणे तुंबून गेलेले आहेत त्या प्रशासनाने अजून पर्यंत साफ न केल्यामुळे नालीचं पाणी रस्त्यावर येताना दिसून आले होते.

                 तसेच या गावला येण्यासाठी चातगाव ते मेंढाटोला सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

           मेंढाटोला या गावापासून मकेपायली हे गाव आठ किलोमीटर अंतरावर आहे तसेच होरेकसा दोन किलोमीटर अंतरावर आहे. या दोन्ही गावाला जाण्यासाठी गिट्टीचा रस्ता आहे व या रस्त्याची गिट्टी पूर्णपणे उखळून रस्त्यावर पडलेली आहे त्यामुळे गाडी चालवताना दुचाकी वाहनांना कसरत करून मार्ग काढावा लागतो. प्रसंगी अपघातही घडल्याचे प्रकार घडलेले आहेत. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन रस्ता तयार करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.