राजेंद्र रामटेके
विशेष विभागीय प्रतिनिधी
धानोरा तालुक्यातील मौजा- सुरसुंडी,ईरुपटोला येथे आमदार रामदास मसराम यांनी आज भेट दिली.
आरमोरी विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरघोस मताने निवडून दिल्याबद्दल आभार मानण्यासाठी व समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने योग्य उपाययोजना करण्यासाठी जनतेची भेट घेतली.
या भेटीदरम्यान, नागरिकांशी सविस्तर संवाद साधला आणि त्यांच्या अडचणींविषयी सखोल संवाद साधला. त्यांच्या या समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्ही ठोस पावले उचलू, अशी मी जनतेला ग्वाही दिली आहे.
जनतेच्या कल्याणासाठी नेहमीच तत्पर राहून काम करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे.