दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : अठरा अध्यायांच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत भगवदगीतेवर केलेले भाष्य, ओव्यांच्या माध्यमातून सोप्या भाषेत उलगडलेले विश्वाचे तत्वज्ञान हा प्रत्येक पिढीसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे.
ज्ञानेश्वरीरुपी ग्रंथातील मराठी भाषेचा गोडवा अन्य भाषिकांना कळावा, आत्मसात करता यावा यासाठी ज्ञानेश्वरीचा इंग्रजी अनुवाद श्रीसंत बुवासाहेब ठाकुरबुवा संस्थानचे डॉ.टी.बी.गरुड व डॉ.एस.डी.सुर्यवंशी यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
श्री ज्ञानेश्वरीच्या इंग्लिश अनुवादाचे प्रकाशन संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधून माऊली मंदीरात आळंदी देवस्थानने प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार संजय जाधव, डॉ.मीरा गरुड, माजी नगराध्यक्ष रोहीदास तापकीर, चैतन्य महाराज कबीरबुवा, डॉ.राम गावडे, ज्ञानेश्वर वीर, संजय घुंडरे, अमोल वीरकर, अजित वडगावकर, वेद महाराज कबीरबुवा आदी मान्यवर उपस्थित होते.