सोसायटीच्या दुर्लक्षीत पणामुळे लाखो रुपयाच्या खराब धान्याची वसुली कोणा कडून? — गोडावून नसतानाही खरेदी केंद्र दिले कसे ?

भाविकदास करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधी

        महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत धानोरा तालुक्यातील मोहली या संस्थेमध्ये धानाची चालू खरिप हंगामात 21100क्विटल धान्याची खरेदी करन्यात आली.

            गोडावून अभावी धान्य उघड्यावर साठवून ठेवण्यात आले खरे पण संस्थेला ताडपत्री पुरवून ही योग्य प्रकारे पावसाळा भर हिफाजत न केल्याने पाणी आत घुसले आणि मोठ्या प्रमाणावर धान्य खराब झाले,काळे पडले, धान्य उगविल्याने या खराब धान्याची जबाबदारी कोण स्विकारणार की शासनाच्या माथी मारल्या जाईल असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

         21100 क्विंटल धान्य खरेदी केले पण या धान्याची वेळीच उचल झालेली नाही.मोहली सोसायटी ने खरेदी केलेल्या धाना पैकी 12492.19 क्विंटल धानाचे डिओ झाल्याचे कळते. त्यात सार्थक राईस मिल वडसा 3400.56, विशाल राईस मिल 765, माँ शारदा राईस मिल कुरुड 4173.28, जय अंबे राईस मिल वडसा 521.60, 1845.82, महाकाली राईस मिल 1786.88 ही माहिती राजेश ठाकरे विपणन निरीक्षक टी डी सि धानोरा यांनी दिली.

           धान्य मोकळ्या जागेत उघड्यावर ठेवलेले असताना पावसाळ्यात पाणी पडला, अवकाळी पाऊस झाला. गोडावून अभावी उघड्यावर खरेदी करून पटांगणात मेनकापड ताडपत्रीने झाकून ठेवले खरे पण धान्य खराब झाले.आणि संस्थेची पोल खोलली.

          करोडो रुपयांचे नुकसान झाल्याने याला जबाबदार कोण? असा प्रश्न धानोरा तालुक्यातील लोक विचारत आहेत. संस्थे कडिल धान्य वेळीच उचल करने गरजेचे असतानाही वेळीच उचल झालेली नाही.आता खराब झालेल्या धान्या साठी कोणाला जबाबदार धरले जाणार आहे.खरेदि केलेल्या धान्याची काळजी घेणे, आवश्यक होते मात्र काळजी न घेतल्यामुळे धान्य खराब झालेले आहे.

        संस्था कडे गोडावून नाही तर खरेदि केंद्र दिले कसे असा प्रश्न सुद्धा शेतकरी विचारीत आहेत. 

           खराब झालेल्या धान्याची. जबाबदारी कोण सोसनार असा प्रश्न लोक विचारत आहेत.

          आधारभूत धान खरेदी योजना आदिवासी उपयोजन क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळ एजंट म्हणून स्थानिक सहकारी संस्थामार्फत राबविली जाते.या खरिप हंगामात मोहलि येथील सेवा सहकारी संस्थेनं 21100क्विटल धान्याची खरेदी केली.पण धान्य उचले पर्यंत सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संस्थेची असते.संस्थेने पाहिजे त्या प्रमाणात काळजी न घेतल्याने धान्य खराब झाल्याचे स्पष्ट दिसुन येते.

           उचल होण्यापूर्वी ऊनाने धान्य सुकतात, उंदिर खातात,घुस पोखरून नासधूस करते यामुळे टूट येते याचा नाहक भुदंन संस्थेला तर पडते त्यामुळे संस्थां अडचणीत येत असतात.यातच भर अवकाळी पावसाची.

            तालुक्यातिल कोणतिहि संस्था स्थापनेपासून फायद्यात नसुन सर्वच तोट्यात दिसुन येतात.यामुळे पुन्हा संस्थेचे फावत असुन.धान्य खराब झाल्याचे दाखले जाते. यावर वेळीच कारवाई होने आवश्यक आहे.