हेमंत सोरेन चौथ्यांदा मुख्यमंत्री.. — झारखंडचे महामहीम राज्यपाल संतोष गंगवार यांनी दिली पद व गोपनीयतेची शपथ…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

             वृत्त संपादीका 

           आज ४ वाजून १० मिनीटांनी झारखंडचे महामहीम राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.ते झारखंड राज्याचे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.

               राष्ट्रगीत झाल्यानंतर लगेचच झारखंड राज्याचे महामहीम राज्यपाल संतोष गंगवार यांनी हेमंत सोरेन यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला सुरुवात करण्याची परवानगी दिली.झारखंडची राजधानी रांची येथे समारोह संपन्न झाला.

                या सोहळ्याला देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे,दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय अरविंद केजरीवाल व त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल,पंजाबचे मुख्यमंत्री भगतसिंग मान,पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव,बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टाॅलीन,मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन,झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन,कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डि.के.शिवकुमार आणि देशातील गणमान्य नेते मुख्यमंत्री शपथ समारोहाला उपस्थित होते.