न भूतो न भविष्यती महाराष्ट्रीयन जनतेला आव्हान…
” येत्या 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका स्वतंत्र भारतात प्रवेश करणार आहोत. आपण पूर्वी कधी स्वतंत्र नव्हतो असं नाही.तर आपण आपले स्वातंत्र्य गमावून का बसलो?
या कल्पनेनेच माझे काळीज चर्रर्रर्र होते आहे…
येणाऱ्या 26 जानेवारी 1950 नंतर जर आम्ही स्वातंत्र्य गमावून बसलो…
तर आम्ही आमचे स्वातंत्र्य पुन्हा कधीच परत मिळवू शकत नाही.
“ही कल्पनाच मला मुळी करवत नाही.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
(25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या संविधान सभेतील शेवटच्या भाषणातील हा महत्वाचा सार )
सर्व लोकशाहीनिष्ठ, संविधाननिष्ठ आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रीयन मतदारांनो,आपल्या सदसदविवेकबुद्धीला आवाहन करतो,की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वरील भाषणातून जो धोका या लोकशाहीला सांगितला होता.तो धोका पाऊल न वाजवता संविधानविरोधी शक्तीने देशात 2014 पासून प्रथम गोगलगायीची गती,नंतर 2019 पासून कासवाची गती,आता 2024 मध्ये सशाची गती घेऊन सर्व संविधानिक संस्था उध्वस्त करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे ( 2025 शताब्दीवर्षानिमित्त ).
त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे 2024 मधील लोकसभाच्या निवडणुकातील मुख्यनिवडणूक आयोगाच्या माध्यमातून EVM वर सेटिंग करुन जनतेच्या मताचे हणन करुन, विरोधी पक्षांना संपवून तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर बसले.
त्यानंतर आमच्यापुरोगामी आणि देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात जिथे अनेक महापुरुषांनी जन्म घेतला त्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत EVM ला सेटिंग करून आमच्या मताचा अधिकार 100% हिरावून घेतलेला आहे…..
आणि पुन्हा तिसऱ्यांना तेच सरकार,तेच प्रतिनिधी,तीच लुटारूची टोळी,पुन्हा त्याच संविधानविरोधी शक्तीची त्सुनामी आलेली आहे.ती यासाठीच की पुन्हा स्वातंत्र्य गमावून बसण्यासाठी..
आणि पुन्हा आपण ते कधीही न मिळविण्यासाठीच ( घटनाकाराच्या भाषणातील इशाऱ्यानुसार )…..
या संविधानविरोधी शक्तीला जर शह द्यायचा असेल,देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल,तर लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कानुसार मी आपल्याला आवाहन करीत आहे.की…….
येत्या सहा डिसेंबर 2024 च्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करुन त्या त्या संबंधित तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्तालयावर सर्वपक्षीय,सर्व संघटनेला आवाहन करुन महामोर्चाचे आयोजन करूया……
“आम्ही भारताचे लोक,…
(संविधानाच्या उद्देशीकेतील पहिल्या तीन शब्दालाच प्रमाण मानून )
वरील शीर्षकाखाली महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात या महामोर्चाचे आयोजन करूया.
मागणी एकच…….
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आव्हान करु की आता महाराष्ट्रात EVM वर झालेल्या विधानसभा निवडणुकामध्ये ( भारतीय जनतेला ) अनेक गडबडीचे घोटाळे झालेल्याचे अनेक पुरावे समोर आल्यामुळे,एवढेच काय उमेदवाराचेच मत उमेदवाराला पडू न शकल्याचे पुरावे आल्यामुळे,आम्हाला या निवडणुका मान्य नाहीत.पुन्हा एकदा याच मुख्य निवडणूक आयोगाने ताबडतोब……
बॅलेट पेपरवरच….
महाराष्ट्राच्या निवडणुका घेऊन लोकशाही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करावा.ते सुद्धा स्वतंत्र आणि निष्पक्ष पद्धतीनेच….
या प्रमुख मागणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चे एकाच दिवशी धडकवण्यासाठी सर्वांनी मिळून म्हणजेच सर्व विरोधीपक्ष,सर्व सामाजिक संघटना,या सर्वांच्या वतीने एकमेकात समन्वय साधून जनता रस्त्यावर उतरण्याची हीच सुवर्णसंधी समजून वेळ न दवडता ( वेळ अत्यंत कमी असल्यामुळे ) नियोजन करुन महामोर्चाचे 6 डिसेम्बरला आयोजन करुन या RSS चे व भाजपचे बटीक आणि गुलाम झालेल्या मुख्य निवडणूक आयोगाला धडा शिकविण्याची हीच सुवर्णसंधी.आपण (भारतीय जनतेने तीचा लाभ घ्यावा)….
कारण……
लोकशाहीत जनतेची ईच्छाच सर्वोच्च स्थानी असते…..
साठीच सर्वकाही त्याग, संघर्ष आणि समर्पनाची आवश्यकता आहे…..
******
टीप:- विनंती आणि आवाहन की, ही पोस्ट जास्तीत जास्त व्हायरल करावी आणि कृतीत उतरावी….
*****
यासाठी मागणीचे निवेदन सुद्धा आज रात्री मी टाईप करुन आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर आणि मोबाईलद्वारे पाठवून देईन….
*****