ग्रंथालय हे प्रत्येक व्यक्तींचे उत्तम भविष्य असल्याने शासन स्तरावर शिक्षणाबरोबरच ग्रंथालयासाठी विशेष बजेट तयार करावा. – डॉ. सतिश वारजूकर..

    रामदास ठुसे

विशेष विभागीय प्रतिनिधी..

चिमूर:-

         देशाचे शैक्षणिक धोरण बळकट करण्यासाठी ग्रंथालये विकसित करायलाच हवीत.सुशिक्षित समाजात ग्रंथालयांना योग्य स्थान देण्यासाठी सरकारने शिक्षणाबरोबरच ग्रंथालयासाठी विशेष बजेट तयार करण्याचा विचार करायला हवा,अशा प्रकारचे महत्वपूर्ण प्रतिपादन डॉ.सतिश वारजूकर यांनी ग्रंथालय जिल्हा अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातंर्गत केले.

            ते मुख्य मार्गदर्शक म्हणून पुढे बोलताना म्हणाले की, प्रत्येक गाव,शहर,वर्ग,प्रत्येक विद्यार्थी,शेतकरी,गृहिणी,व्यापारी, नोकरदार आणि देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत ग्रंथालयाचा लाभ पोहोचल्यास देशातील विकासाचे खरे चित्र दिसून येईल.

          ग्रंथालय हा वाचकांसाठी ज्ञानाचा महासागर आहे.ग्रंथालयाशिवाय शिक्षण व सुसंस्कृत समाजाची कल्पनाच करता येत नाही.आपल्या सर्वांच्या जीवनात ग्रंथालयाचे अमूल्य योगदान आहे.आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,प्रत्येक अडचणीत पुस्तके माणसाशी खऱ्या मित्रासारखी सोबतीला असतात.हे तेव्हाही सोबत असतात जेव्हा आपल्याला कोणी साथ देत नाही.

             ज्याला जीवनात ग्रंथालयाचे मूल्य समजले नाही,तो उत्कृष्ट जीवन जगलाच नाही.ग्रंथालये वाचकांना त्यांचे जीवन सोपे,सुलभ,उज्ज्वल आणि प्रगतीच्या मार्गावर जाण्यासाठी सतत प्रेरित करून एक चांगला मार्ग तयार करतात.ग्रंथालयांचे जाळे जगभर पसरलेले आहे ग्रंथालयांच्या विकासासाठी सर्वात आवश्यक म्हणजे तज्ञ कर्मचारी,योग्य वाचन साहित्य आणि पुरेशा निधीसह उत्कृष्ट व्यवस्थापन,विकसित ग्रंथालये,वाचकांना उत्तम सेवा देऊन देशाच्या विकासात मोलाचे योगदान होईल असे सुध्दा डॉ.सतिश वारजूकर म्हणाले.

            आज चिमूर तालुक्यातील विठ्ठल रुखमाई देवस्थान सभागृह सभागृह भिसी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय भिसी यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघ वार्षिक अधिवेशन २०२३ च्या कार्यक्रमाचे निमित्त ग्रंथालयाच्या वाढत्या अडचणी व शासनाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करतांना ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर,यांनी आपल्या भाषणातून विविध अंगातंर्गत संबोधित केले.

          या कार्यक्रमाप्रसंगी प्रदेश कांग्रेस कमिटी ओबीसी सेलचे संघटक धनराज मुंगले,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ डॉ.गजानन कोटेवार,श्री.बोरगमवार,रत्नाकर नलावडे,सचिव शामराव रामटेके,अध्यक्ष सौ.आशाताई भिमटे,उपाध्यक्ष किशोरजी शेंडे,सहसचिव प्रकाश मेश्राम,वामन मेश्राम,मंगेश रामटेके,जितेंद्र मेश्राम,सौ.कमल गोंगले,उपस्थित होते.