रामदास ठुसे
विभागीय प्रतिनिधी
चिमूर –
या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचे राज्य दिले. मात्र याच देशात दहा वर्षापासुन हुकूमशाही सुरु आहे. तुमचे आमचे आरक्षण संपवून खाजगीकरण करणे सुरू आहे.या देशातील नागरीकांना अन्न-वस्त्र-निवारा-आरोग्य-शिक्षण,सोयी व सुविधा गरीबा पर्यत पोहचाव्यात म्हणून डॉ. बाबासाहेबांनी संविधानात तरतूद केली.मात्र देशात उलट कार्ये सुरु आहेत.देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आणली जात असेल व त्यातंर्गत समस्यांवर समस्या निर्माण होत असतील तर गरीब नागरिक जिवण जगतील काय? संविधान सुरक्षीत राहील काय? असा मार्मिक प्रश्न उपस्थित करून आपल्या जनतेप्रती असलेल्या पोटतिडकीच्या संवेदना मार्गदर्शनाद्वारे डॉ.सतिष वारजूकर व्यक्त केल्यात.
ते पुढे म्हणाले की,बहुजनांची मुलं विद्याविभूषीत होवून बेरोजगार आहेत.परंतु मागच्या दरवाज्यातुन मनुवाद्याची मुलं सचिव होत आहे.या देशाचे पंतप्रधान इंडिया एवजी भारत नाव करण्याच्या तयारीत आहेत,हा एक प्रकारचा धोका आहे,त्यामुळे हल्ली बहुजनांना विचार करन्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एक मताचा अधिकार दिला मताचे विभाजन न करता एक संघ राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवर चालणार सरकार स्थापीत करून संविधान जिवंत ठेवले पाहिजे.संविधान जिवंत राहीले नाही तर पूढची पिढी बरबाद होणार असल्याचे प्रतिपादन संविधान दिनानिमित्त उद्धघाटनीय भाषणात डॉ.सतिश वारजूकर यांनी केले.
संविधान सन्मान दिन समारोह वडाळा (पैकु) चिमूरच्या वतीने २६ नोव्हेंबर रविवारला आयोजित केला होता.हा कार्यक्रम संविधान चौक वडाळा (पैकु) चिमूर येथे घेण्यात आला होता.
संविधान सन्मान दिवस या कार्यक्रमांचे उद्धघाटन महाराष्ट्र प्रदेश महासंघ ओबीसी उपाध्यक्ष डॉ.सतिश वारजूकर यांनी केले.दरम्यान उपस्थित मान्यवरांनी संविधान चौकातील नामफलक व संविधान प्रतीकृतीला पुष्पमाला अर्पण केली.
कार्यक्रमा दरम्यान पाकी पवण ताकसांडे या मुलींची निवड नवोदय विद्यालयात झाली त्यामूळे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाकी व तिचे आई वडील यांचा सत्कार करन्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरचे सल्लागार प्रभाकर पिसे यांनी मार्गदर्शन करताना देशाचे संविधान सर्वोच्च असल्याचे सांगितले.प्रमुख मार्गदर्शक नालंदा अकाडमी वर्धाचे अनुपकुमार यांनी भारताचे संविधान व त्यापूढील आव्हाने या विषयावर बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रबुद्ध भारत बनविन्याचे अधूरे राहीलेले स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न केले पाहिजेत यावर मार्गदर्शन केले.मुख्य मार्गदर्शक भूमीपूत्र ब्रिगेड महाराष्ट्रचे डॉ.समिर कदम यांनी भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे हित यांचा सहसंबध याविषयी महत्त्व पटवून देताना अनेक उदाहरणे देत अजूनही ओबीसी वर्ग जागृत झाला नाही याबाबत खंत व्यक्त केली.
भारतीय संविधान सन्मान,सुरक्षा,संवर्धन अभियानच्या मुख्य प्रबोधक तथा कार्यक्रमाच्या मुख्य मार्गदर्शक कविता मडावी यांनी,”भारताचे संविधान आणि राष्ट्रव्यापी जनजागृतीची आवश्यकता व नागरिकांची भूमिका या विषयावर बोलताना भारतीय संविधान घरा घरापर्यंत पोहचविण्याची जिम्मेदारी घ्यावी व संविधानाला अनुसरून जनजागृती करणे अनिवार्य असल्याचे सांगितले.तद्वतच संविधान म्हणजे नेमके काय? याबाबत देशातील नागरिकांना अजुनही माहिती नाही.यामुळे त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव नाही अशाही त्या म्हणाल्यात.
कार्यक्रमाच्या प्रसंगी चिमूर पंचायत समितीचे माजी उपसभापती रोशन ढोक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच संविधान सन्मान दिन समारोह समितीचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान सकाळी शहरातील थोर महापुरुषांच्या स्मृती स्थळांना भेट देत अभिवादन करण्यात आले व शहरातून संविधान बाईक रॅली काढन्यात आली.
सायंकाळी कमलेश भोयर यांचा,”भिमराव एकच राजा, संगितमय प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सुरेश राऊत,ताई मेश्राम,प्रास्तावीक महेंद्र लोखंडे,आभार आनंद गजभिये यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.