छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
श्री. साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची 132 पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जिभकाटे सर प्राचार्य तथा प्रमुख पाहुणे म्हणून आकरे मॅडम नवखरे मॅडम, लोथे सर , अवचट सर, निकुरे सर ,करमरकर सर, नैताम सर हजर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पाहुण्यांच्या हस्ते पुष्पांजली वाहिल्या गेली. त्यानंतर समस्त पाहुणे गणांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात नवखरे मॅडम यांनी महात्मा फुले यांचे सामाजिक, शैक्षणिक व शेती विषयक विचार स्पष्ट केले. त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे झालीत यात कुंदन साखरे, वैष्णवी निकुरे ,धनश्री नंदनवार, तन्वी बावनथडे ,सायली कोल्हे, प्रीती गावडे इत्यादींची भाषणे झालीत. शेवटी अध्यक्षीय भाषणातून जिभकाटे सरांनी महात्मा फुले यांचे संघर्षमय जीवन व शैक्षणिक कार्य याबद्दल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन छन्ना खोब्रागडे सर तर आभार प्रदर्शन हरीश करमरकर सर यांनी केले.