ऋषी सहारे

संपादक

 

गडचिरोली –

आदर्श मित्र मंडळ, पुणे आणि लक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूर यांचे सहकार्याने तथा अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील मौजा – गेदा येथे दि.२७/११/२०२२ ला आदिवासी भागातील महिला/किशोरवयीन मुलींना मासिक पाळी बाबत व्हिडिओ च्या माध्यमातून मार्गदर्शन व कापडी सॅनिटरी पॅड तयार करण्याचे प्रशिक्षण प्रेमिला कुमोटी प्रशिक्षीका गडचिरोली यांचे कडून देण्यात आले तसेच कुर्मा घरावर सोलर पॅनल बसविणे,एल.ई.डी.लाईट,पॅन, पाणी साठवण हौद, बकेट,मग्गा, आणि २- पलंगाची व्यवस्था करुन कुर्मा घराचे नुतनीकरण करण्यात आले. त्याकरिता उदय जगताप आदर्श मित्र मंडळ पुणे आणि डाॅ. सलूजा आलापल्ली यांचे मार्गदर्शनात अकिल शेख सचिव-अभिनव बहुउद्देशीय कला मंच, गडचिरोली यांचे नियोजनानुसार व मा.चेतन गायकवाड, आलापल्ली यांनी पुढाकार घेतला तसेच सौ.रजनी वैरागडे, सदस्य – ग्रामपंचायत गेदा,मिरवा पदा सदस्य – ग्रामपंचायत गेदा मा.तेलामी, सदस्य – ग्रामपंचायत,गेदा मा.तारा वैरागडे, अंगणवाडी सेविका मा. माधुरी गड्डमवार, अंगणवाडी सेविका,मा.दिपीका सुरजागडे,आशा वर्कर, मा.साखरे, लिपिक, ग्रामपंचायत,गेदा तसेच महिला बचत गटाच्या सदस्या, गावातील किशोरवयीन मुलीं, आश्रम शाळा,गेदा येथील गृहपाल आणि विद्यार्थ्यांनी यांनी हिरीरीने सहभाग घेतल्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News