पारशिवनी (ता. प्र.)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथे ओळख थोरांची या उपक्रम अंतर्गत स्त्री शिक्षणाचे प्रणेते थोर समाज सुधारक महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरिधर धोटे यांचे हस्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक खुशाल कापसे यांनी महात्मा जोतीराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, शेतकऱ्यांसाठी, विधवा महिलांसाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राष्ट्रपाल मेश्राम, अंगणवाडी सेविका संघमित्रा शेंडे, शालेय पोषण आहार स्वयंपाकी प्रिया मेश्राम उपस्थित होते.