डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
राजाराम :- अहेरी पोलीस उपविभागातील राजाराम खां येथील उप पोलीस स्टेशन ला कार्यरत पोलीस अधिकारी हद्दीतील विकासात्मक व जनजागृती कार्याचे दखल घेत हद्दीतील संतोषभाऊ ताटीकोंडावार व चमु यांच्या वतीने सन्मान व सत्कार सोहळा कर्यक्रम आयोजित करण्यात आले.
राजाराम खां येथील उप पोलीस स्टेशन ला सण २०18 साली प्रभारी अधिकारी म्हणून रविंद्र भोरे व उपपोलीस निरीक्षक म्हणून विजय कोल्हे यांनी पदभार घेतले असता हद्दी परिसरातील ग्रामीण जिवनपद्धती,मागासलेपणा, अशिक्षितपणा, शासकीय योजनेपासून वंचित, रस्ते, पाणी, आदी समस्यांचे जाणीव झाले. या परिसरात शासकीय योजने दिले पाहिजे यावर भर देत दादालोरा खिडकी च्या माध्यमातून हद्दीतील अनेक नागरिकांचे शासकीय कामे करून दिली व मोटार सायकल वाहन परवाना, राशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ईश्रम कार्ड, अनेक तंटे, अनेक रस्ते दुरुस्त, मेळाव्याचे माध्यमातून जनजागृती, झाडें वाटप, दैनंदिन वापरवस्तू असे अनेक योजने नागरिकांपर्यन्त पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले आहेत व पोलीस प्रशासन बाबत नागरिकांचे मनोबल तयार करून नागरिकांना पोलीस विभाग मदत करणार अशी अपेक्षा तयार केले आहेत व बहुचर्चित आलापल्ली-सिरोंचा 353 .c राष्ट्रीय महामार्गांवर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होण्याचे प्रमाण वाढल्याने महामार्गांवर मुरूम टाकून खड्डे भरण्याचे काम नुकतेच पोलीस विभाग केले आहेत. स्टेशन ला सदर तिघे अधिकारी कार्यरत झाल्यानंतर अनेक गावविकासात्मक कामे झाल्याचे दिसून येत आहे करिता श्री.संतोष ताटीकोंडवार व चमु यांच्या वतीने प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे व उपपोलीस निरीक्षक विजय कोल्हे ,उपनिरीक्षक श्री.सचिन चौधरी यांचे शाल व श्रीफळ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आले आहे यावेळी पत्रकार. श्रीधरभाऊ द्दुगीरालापाटी, प्रशांत केकरलावार, स्नेहदिप आत्राम,महेश येनमवार, रोशन कंबगौनीवार, श्रीनिवास लेंडगुरे, महेश गादेवार उपस्थित होते.