युवराज डोंगरे/खल्लार
खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील ब्राह्मणवाडा शेत शिवारात अवैध रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह खल्लार पोलिसांनी काल दि 27 नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास पकडला.
खल्लार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस स्टेशन हद्दीतील कोकर्डा येथील ब्राह्मणवाडा शेत शिवारातील भाटोगा नाला येथून ट्रॅक्टर क्रमांक MH 27,U 9590 विना नंबरची ट्रॉली अवैध रेती ट्रॉलीत भरत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार ठाणेदार चंद्रकला मेसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर घुगे, नापोकॉ विजय निमकांडे,गोपाल सोळंके चालक संतोष चव्हान यांच्यासह भाटोगा नाला येथे गेले असता त्याठिकाणी पोलिसांना चोरट्या अवैध रेती वाहतूक होत असल्याचे आढळले.
खल्लार पोलिसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर व विना नंबरची ट्रॉलीचा पंचनामा करुन रेतीसह इतर साहित्य व ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण 2,56,600रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन तो खल्लार पोलिस स्टेशनला जमा केला याप्रकरणी समाधान सिरसाट रा कोकर्डा व चालक योगेश कायल रा लाखनवाडी यांच्याविरुध्द अप 275/22 कलम 379,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.