प्रेम गावंडे
उपसंपादक
दखल न्युज भारत
चंद्रपूर येथील एकोरी वार्डात राहणाऱ्या भीमराव रंगारी यांची धम्म सहचारिणी नीलिमाचे काल दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ला बल्लारपूर येथील रेल्वे पुलाच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. नीलिमा या मागच्याच वर्षी एका अपघातामध्ये जखमी झाल्या होत्या. परंतु त्यातून बरी झाल्या होत्या. परंतु या वेळेस मात्र, काळाने बरोबर डाव साधला आणि आपल्या सगळ्यांपासून निलीमाला हिरावून नेले. परंतु या दुखाच्या प्रसंगी सुद्धा रंगारी परिवाराने सामाजिक भान राखून स्मृतीशेष निलिमाच्या इच्छेचा मान ठेवत शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथील नेत्रपेढीला निलीमाचे मरणोत्तर नेत्रदान केले. रंगारी परिवाराचा हा निर्णय स्तूत्य असुन समाजाला नक्कीच एक नवीन दिशा देणारा आहे.
या उपक्रमात मार्गदर्शन C S डॉ. रामटेके, योगेंद्र इंदुरकर समउपदेशक, डॉ. पटेल, डॉ. सरोदे, नेत्रचिकित्सक अधिकारी नीलिमा चांदेकर, माधुरी कुलसंगे, नोडल अधिकारी विवेक मसराम, इंजि. प्रदीप अडकीने, सविता लोणारे, ज्योती रंगारी, भिमराव रंगारी, भारत रंगारी, मीना मेश्राम, पिंटू मेश्राम, पंकज मेश्राम यांचे सहकार्य लाभले.