लाखों मतदारांच्या आशिर्वादाने डॉ.सतीश वारजूकरांनी दाखल केलाय उमेदवारी अर्ज.. — ना.विजयभाऊ वडेट्टीवार,खासदार डॉ.नामदेव किरसान,माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर,समाज प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांच्या उपस्थित दाखल केलाय उमेदवारी अर्ज..

 

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादीका 

             चिमूर विधानसभा मतदारसंघातील लाखो मतदारांच्या आशिर्वादाने डॉ.सतीश वारजूकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी किशोर घाडगे यांच्याकडे आज दाखल केलाय.

        डाॅ.सतीश वारजूकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,विश्वभुषण,युगप्रवर्तक,बोधिसत्व,भारतीय संविधान निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर,यांना विनम्र अभिवादन केले.तद्वतच बालाजी देवांचे दर्शन घेतले.

         नेहरू विद्यालय चिमूर येथून उमेदवारी अर्ज दाखल रॅलीला प्रारंभ झाला.लाखो मतदारांची प्रचंड शक्ती डॉ.सतीश वारजूकरांच्या उमेदवारीला भरभरून दाद देत होती व साद घालत होती.

         डॉ.सतीश वारजूकर निवडून येणारच अशा विविध प्रकारच्या गगनभेदी घोषणा देत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मतदार बंधू भगिनीं,पदाधिकारी,कार्यकर्तागण,सहकारीमित्र,यांच्यासह शिस्तबद्ध पद्धतीने उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी चिमूर यांच्या कार्यालयाकडे रॅली क्रमण करीत असतानाचे अस्मरणीय क्षण चिमूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन होणार याची हमी प्रत्यक्ष देत होती..

       डॉ.सतीश वारजूकरांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी चिमूर विधानसभा मतदारसंघातील लाखो आया बहिणी,बंधू,मतदार प्रत्यक्ष उपस्थित असल्याने मतदारांची पुर्ण साथ डॉ.सतीश वारजूकरांना असल्याचे वास्तव पुढे आले.

       महाविकास आघाडी तर्फे चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बिपिएड काॅलेज मैदानात भव्य सभा सुरू होती.

        या सभेला महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार,चिमूर-गडचिरोली मतदार संघाचे खासदार डॉ.नामदेव किरसान,माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अवीनाश वारजूकर,प्रा‌.राम राऊत,प्रशिध्द समाज प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर,माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके,चिमूर विधानसभा युवक अध्यक्ष रोशन ढोक,तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे,विधानसभा अंतर्गत इतर सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

     याचबरोबर आंबेडकर चळवळीतील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.तद्वतच महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) व शिवसेना पक्षाचे (उद्धव ठाकरे गट) पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते सुध्दा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित होते आणि त्यांचे पक्ष दुपट्टे लक्ष वेधून घेत होते..

         (सभेचा इत्तीवृतांत उद्याला..)