युवराज डोंगरे
उपसंपादक
खाजगीकरण व कंत्राटीकरण विरोधात विराट संघर्ष मोर्चा २९ ऑक्टोबरला अमरावती येथे आयोजित केला असून या मोर्चाचे आयोजन सकल शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,युवां व सामजिक संस्था आणि अनेक विभागांतर्गत कर्मचारी संघटना यांचे तर्फे करण्यात आले आहे.
मोर्चा नेहरू मैदान मार्गे,राजकमल चौक,शाम चौक,जयस्तंभ चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गर्ल हायस्कूल चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचून निवासी जील्ह्याधिकारी यांना मागण्याचे निवेदन सोपविण्यात येणार आहे.
**
मोर्चाच्या प्रमुख मागण्या…
१) खाजगीकरण व कंत्राटीकरणं तात्काळ बंद करा,२) सर्व कर्मचारी व अधिकारी यांना १९८२ चीच जुनी पेंशन लागू करा.३) शासकीय नोकरीतील रीक्त पदे तात्काळ भरा.४) शाळा दत्तक योजना, समूह शाळा योजना बंद करा.५) मागासवर्गीयांना तात्काळ पदोन्नती मधील आरक्षण लागू करा.६) सर्व शासकीय विभागातील पदभरती करिता स्पर्धा परीक्षा निःशुल्क घेण्यात यावी.७) सर्व विभागातील कंत्राटी व मानधन तत्वावर लागलेल्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना शासकीय नोकरीत सामावून घ्या.८) शेतकरी व शेतमजुरांना स्वामिनाथन आयोग लागू करा. ९) EPS १९९५ मधील सर्व कर्मचाऱ्यांना किमान ९ हजार रुपये पेंशन व महागाई भत्ता देण्यात यावा.१०) सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रक्रिया सुलभ व नियमित करावी. इत्यादी.
**
मोर्चा यशस्वी होण्यासाठी परिश्रम सुरु..
हा मोर्चा यशस्वी करण्याकरिता सर्व विभागाचे कर्मचारी,शेतकरी,शेतमजूर,बेरोजगार,सर्व dcps/nps धारक आणि अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ अमरावती जिल्हा संघाचे सर्व पदाधिकारी,कार्यकारणी सदस्य आणि सभासद,सर्व तालुका अध्यक्ष व सचिव आणि सर्व तालुका कार्यकारणी व सर्व सभासद,यांनी परिश्रम घेतले सुरु केले आहे.
***
आव्हान..
तद्वतच संघर्ष महा विराट मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन कृती समितीचे वतीने तथा अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ अमरावती द्वारा किरण पाटील राज्य उपाध्यक्ष,जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी,जिल्हा सरचिटणीस सुभाष सहारें,संजय साखरे,अशोक चव्हाण,ज्योतीताई उभाड,प्रमोद घाटोल,संजय वाटाणे,पंडितराव देशमुख,नीलकंठ यावले,राजेंद्र होले,सतिश गुजरकर,संजय नागे,मनोज चोरपगार,सुनीताताई पाटील,जिल्हा समन्वयक वृषाली देशमुख यांनी केले असल्याचे प्रसिद्धी प्रमुख सूरज मंडे यांनी कळविले आहे.