नीरा नरसिंहपूर दिनांक 28
प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,
निरा नरसिंहपुर तालुका इंदापूर येथील श्री क्षेत्र लक्ष्मी नृसिंह मंदिरात पेशवे कालीन प्रसिध्द कुरवंडी (पुरणाचे दिवे) सहस्र पुरणाच्या दिपांनी आरती होत आसते.सरदार विंचूरकर यांचू पासून ही दिपावलीच्या पाडव्या दिवशी नरक चर्तुर्थी दिवशी कुरवंडी सोहळा केला जातो..गेली दोन वर्षे कोरोना काळात साध्या पध्दतीने कुरवंडी सोहळा साजरा झाला. या वर्षी लक्ष्मी नृसिंह देवस्थान ट्रस्ट, पुजारी, ग्रामजोशी, त्रिवर्ग, ग्रामस्थ, नृसिंह भक्त, पंच क्रोशीतील वारकरी मंडळी यांनी फार मोठा सहभाग घेऊन नरक चर्तुर्थी दिवशी दंडवते पुजारी यांचा कुरवंडी सोहळा पार पडला. दिपावली पाडव्या दिवशी लक्ष्मी नृसिंह देवस्थानच्या वतीने सकाळी नृसिंहाची विधीवत पवमान पंचसुक्त व पंचामृत पूजा करण्यात आली दुपारी एक वाजता देवस्थानचे पुजारी ,नृसिंहभक्त, ग्रामस्थ , यांचा कुरवंडी सोहळ्यास झांज वाजवत सुरूवात करून गावातून शोभा यात्रा काढण्यात आली.
लक्ष्मी नृसिंह मंदिरात कुरवंड्या आणण्यात आणल्या श्री नृसिंह देवाच्या पुढे कुरवंडी(सहस्र पुरणाचे दीप दिवे) ओवाळून नरसिंहाची आरती, भक्त प्रल्हांदांची आरती, लक्ष्मीची आरती, सर्व देवतांच्या आरत्या करण्यात आल्या. लक्ष्मी नरसिंहाच्या पादुका पालखी मध्ये ठेवून भव्य मिरवणूक शोभा यात्रा काढण्यात आली .पालखी नीरा व भीमा या दोन नद्यांच्या संगम घाटावर नेऊन “श्री”च्या पादुकांची सोळखांबी येथे पालखीची पुजा कूली. वाजत गाजत पालखी मंदिरात आणली. या सोहळ्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त व ग्रामपंचायत आजी-माजी सरपंच -उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाविक भक्त आणि महिला भगिनीनी व गावातील ग्रामस्थ, पुजारी, ग्रामजोशी नृसिंह भक्त, मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा सोहळा लक्ष लक्ष पुरणांच्या दिव्यांनी (दीप) सर्वांनी पाहिला.
लक्ष्मी नरसिंहाचा हा सोहळा इतर ठिकाणी कोठेही पहावसास मिळत नाही.लक्ष्मी नृसिंह देवस्थान विश्वस्त कमेटी यांनी या सोहळ्यास आलेल्या सर्व भावीक भक्तांचे महाप्रसाद देऊन सर्व पुजारी मंडळाचे,ग्राम जोशी ,ग्रामस्थांचे व भाविकांचे यावेळी आभार मानले.