पारशिवनी (ता. प्र.)

मानवी मूल्यांसह समग्र विकासाचा दृष्टिकोन ठेवून विद्यार्थी, शिक्षक व समाजासाठी कार्य करणाऱ्या वेध प्रतिष्ठान नागपूर द्वारा दीपावली निमित्त आयोजित पारशिवनी तालुक्यातील माहुली येथील व्यंकटेश वृद्धाश्रमातील गरज ओळखून गाद्या व उशा तसेच फराळ देऊन दीपोत्सव – स्नेहानुबंध कार्यक्रम साजरा करण्यात आला.

वेध प्रतिष्ठान द्वारा गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षकांसाठी अनेक शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आहे.यासोबतच सामाजिक दायित्व म्हणून समाजातील वंचित, गरजू, निराधार घटकांसाठी दीपावलीच्या पर्वावर ‘दीपोत्सव स्नेहानुबंध’ उपक्रम राबवित असते. यावर्षी कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय चालणाऱ्या व्यंकटेश वृद्धाश्रम माहुली येथील आश्रमाची गरज ओळखून तेथील वृद्धांसाठी गाद्या व उशा देवून त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. या वृद्धाश्रमातील वृद्ध हे निराधार असून या आश्रमाचे संचालक अश्विन अंजीकर व त्यांची पत्नी टीना अंजीकर सेवाभावी वृत्तीने त्यांची सेवा करीत आहे. दीपावली निमित्त वेध परिवार द्वारा फराळ देऊन त्यांच्या आनंदात सहभागी झाले. आश्रमाचे संचालक अश्विन अंजीकर यांनी वेध परिवाराने केलेल्या मदतीबद्दल आभार मानले. याप्रसंगी वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.मनोहर नरांजे, उपाध्यक्ष वसंत गोमासे, सचिव खुशाल कापसे, कोषाध्यक्ष ओंकार पाटील, डॉ.अश्विन किनारकर, राजेश माहूरकर, प्रशांत बठ्ठे प्रामुख्याने उपस्थित होते. दीपोत्सव स्नेहानुबंध उपक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र टेकाडे, डॉ.कीर्ती पालटकर, धनंजय पकडे,मनीषा उईके, शंकर जीवनकर, वासंती गोमासे, अशोक बोरीकर, मनीषा चौधरी, सचिन चव्हाण, लीलाधर सोनवणे, शालिनी लोही, डॉ.शिल्पा सूर्यवंशी, वैशाली ठाकरे, सविता चात्रेशवार, मारोती मुरके, विनीत पद्मावार, वंदना राऊत, घनश्याम भडांगे, प्रशांत वऱ्हाडे यांनी सहकार्य केले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com

Top News