सिध्दबेटाच्या विकासासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : अलंकापुरीत संत ज्ञानेश्वर आणि त्यांचे भावंडे यांचे अधिकाधिक वास्तव्य असलेले सिध्दबेटाचे आणि वारकऱ्यांची जननी असलेली इंद्रायणी नदी चे पावित्र्य जोपासण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आळंदी येथे बोलताना दिले.

           शिवाजीराव आढळराव पाटील यांचा माजी खासदार आपल्या दारी व गावभेट दौरा या अंतर्गत आळंदी आणि केळगावला भेट दिली. केळगाव येथील दौऱ्यात इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांनी त्यांना इंद्रायणी नदी व सिध्दबेटाच्या विकासासाठी लक्ष घालावे अशी मागणी केली, मग स्वतः आढळराव पाटील यांनी लगेच सिद्धबेटाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला यावेळी त्यांनी सिद्धबेटाची संपूर्ण पाहणी करुन सिद्धबेटासाठी काय करता येईल यासंबंधी विठ्ठलराव शिंदे आणि केळगाव ग्रामस्थांच्याकडून माहिती घेतली. यावेळी आढळराव पाटील यांच्याहस्ते सिध्दबेटात वृक्षारोपण करण्यात आले.

         श्री क्षेत्र सिध्दबेट हे केळगाव हद्दीत असल्याने केळगावचा ही विकास व्हावा अशी मागणी यावेळी सचिन विरकर यांनी यावेळी मा. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडे केली.

        यावेळी शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, तालुका प्रमुख राजूशेठ जवळेकर, संघटक प्रकाश भुजबळ, निलेश गोरे, ज्योती अरगडे, पांडुरंग वहीले, विजयसिंह शिंदे, राहुल थोरवे, सचिन विरकर, संतोष सोनवणे, सुदाम गुंड, संतोष विरकर तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.