आमदार किर्तीकुमार भांगडियांच्या हस्ते विविध इमारत बांधकामांचे भुमिपूजन…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधी..

     आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या हस्ते प्रशासकीय भवनाचे,सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयीन इमारतीचे व चिमूर येथील वाल्मीक समाजचे सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.सदर तिन्ही बांधकामासाठी २५ कोटी ४६ लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.

     दरम्यान आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे प्रशासनाच्या वतीने छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांची मूर्ती,शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन उत्स्फूर्त स्वागत-सत्कार करण्यात आले.

       तहसील कार्यालयात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी मंचावर प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे,सहाय्यक जिल्हा निबंधक अंकिता तांदळे,तहसीलदार राजमाने,भाजप ओबीसी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे,तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ.मायाताई नन्नावरे,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष बालू पिसे तथा भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

       अर्थसंकल्प योजना सन २०२४-२५ अंतर्गत चिमूर येथे अतिरीक्त जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व महसुली कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम करणे. (कामाची किंमत रू. १४३१.६३ लक्ष.)

        अर्थसंकल्प योजना सन २०२४-२५ अंतर्गत चिमूर तहसील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे बांधकाम करणे. (कामाची किंमत रू. ३५०.०० लक्ष.)

       अर्थसंकल्प योजना सन २०२४-२५ अंतर्गत ता. चिमूर, जि.चंद्रपूर येथे २९ तलाठी कार्यालयाचे बांधकाम करणे. (कामाची किंमत रू. ४३५.०० लक्ष.)

        ठेव बांधकाम योजना सन २०२४-२५ अंतर्गत दुय्यम निबंधक श्रेणी – १ चिमूर जि. चंद्रपूर या कार्यालयाच्या नविन इमारतीचे बांधकाम करणे. (कामाची किंमत रू. २१४.२६ लक्ष.)

          अर्थसंकल्प योजना सन २०२४-२५ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर या कार्यालयीन इमारत बांधकामाचा (कामाची किंमत रू. २२२.२८ लक्ष.)

        २५१५ योजना सन २०२४-२५ अंतर्गत चिमूर येथे वाल्मीक समाज सामाजिक सभागृह बांधकामाचा (कामाची किंमत रू. १००.०० लक्ष.)भूमिपूजन करण्यात आले.

       भुमिपूजन कार्यक्रमाचे संचालन एकनाथ थुटे यांनी केले.तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग उपविभागीय अधिकारी उपगलनवार,भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर शहर अध्यक्ष बंटी वनकर,श्रेयस लाखे,अमित जुमडे,नरेंद्र हजारे,शैलेश पाटील,संदीप पिसे,विनोद चोखरे,योगेश नाकाडे,अर्जुन पाटील थुटे,करण चावरे,राजु बोडणे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

       या प्रसंगी आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचे समस्त वाल्मिकी समाजा तर्फे वाजतगाजत मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले व सत्कार करण्यात आला.