सामाजिक वनिकरण विभागातर्फे जि.प.शाळा नयाकुंड येथे वृक्षारोपण.. — सरपंच अवस्थी याचे हस्ते करण्यात वृक्षरोपण..

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- आज सकाळी १०.३० वाजता सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र कार्यालय पारशिवनी मार्फत वन महोत्सव व,”एक पेड मां के नाम,या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा नयाकुंड येथे एकूण ५० रोपे शाळेच्या आवारात लावण्यात आले.

       सदर कार्यक्रमांमध्ये सामाजिक वनिकरण विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारि किशोर कैलुके श,सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोरगांव-अर्जुनीचे श्री.खोब्रागडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत नयाकुंड येथील सरपंच श्री.सुधिर अवस्थी याचे अध्यक्षेत खाली वृक्षारोपण करण्यात आले.

          याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थी,पालक वर्ग,अंगणवाडी सेविका,मदतनिस प्रामुख्याने उपस्थित होते.

          वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये, नयाकुंड गावातील सरपंच सुधिर अवस्थी,सामाजिक वनिकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. किशोर कैलूके, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी मोरगांव-अर्जुनी श्री. खोब्रागडे सर,वनपाल श्री.अनिल राठोड,वनरक्षक श्री.सुरज चोपडा,वनसेवक श्री.मनोहर शेंडे,श्री.ढोके व इतर वन कर्मचारी उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक यांनी केले तर समारोपीय आभार सहायक शिक्षक यांनी मानले.