ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्युज भारत
साकोली : वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था व इंडो एशियान मेत्ता फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव पूजनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश महायात्रेचे 30 सप्टेंबर रोजी सकोलीत डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या प्रयत्नांतून आगमन होणार आहे.
ऐनवेळेवर का होई ना, संपूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी ही एक सौभाग्य आहे की आपल्या जीवन काळात ही सुवर्ण संधी आपल्या क्षेत्रात चालून आली आहे, असे उद्गार आयोजक डॉ. सोमदत्त ब्रह्मानंदजी करंजेकर यांनी काढले.
ह्या अस्थिकलश श्रीलंकातून आल्या असून दर्शनाची वेळ दुपारी २:०० ते ४:०० आहे व दर्शन सोहळा हा बाजीरावजी करंजेकर फार्मसी कॉलेज च्या प्रांगणात राहील.
देश विदेशातून बौद्ध भिक्खुंचे देखील उपस्थिती असेल, तसेच यावेळी भगवान बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलश दर्शनाचा लाभ भाविक मोठ्या संखेने घेतील अशी माहिती डॉ. करंजेकर यांनी दिली.