रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी…
चिमूर /- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने महिलांची सुरक्षितता याविषयी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बनसोड होते.आपल्या मार्गशनात त्यांनी महिला सुरक्षीतता विषयी मार्गदर्शन केले.ते म्हणाले की समाजातील महिला व पुरुषानी दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे.स्त्रियावर आत्याचार होऊ नये याकरिता सर्वानी जागरूक असावे.
प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य सपना नगराळे,शासकीय औद्योगिक शिक्षण संस्था चिमूर यांनी आपल्या भाषणात महिला घराबाहेरही सुरक्षित नाहीत.इतर देशांतील महिला प्रवासीही भारतात येण्याचा विचार करताना संशयास्पद स्थितीत असतात.मात्र,ही भीती त्यांना कोणत्याही सामाजिक उपक्रमापासून दूर ठेवू शकत नाही.कायदे आहेत,पण सुरक्षेचे योग्य उपाय असले पाहिजेत.ज्यांचे पालन आपण स्त्रियांना हिंसेपासून संरक्षण करण्यासाठी काटेकोरपणे केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
प्रियंका बल्की यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये महिलांनी आपली सुरक्षितता करण्यासाठीआपल्या जवळ मिरची पावडर,स्प्रे फवारणी छोटे ब्लेड चा वापर आणीबाणी प्रसंगांत करावा.महिलांनी स्वसंरक्षण करणाऱ्या अनेक युक्त्या इंटरनेट वर उपलब्ध आहेत.त्या आत्मसात कराव्या,सुरक्षितता करण्यासाठी विविध कायद्यांचा अभ्यास करावा.
प्रास्ताविकेतून समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा.पितांबर पिसे यांनी सांगितले की विशाखा गाइड लाईन ते पोस्को दक्षता इ. सर्व कायद्याचा पूर्णपणे अभ्यास करावा.समाजात या कायद्यांची जनजागृती हवी आहे.कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने पुढे यावे आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा जागृत असावे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.हरेश गजभिये यांनी केले.आभार विद्यार्थी विकास विभागाचे समन्वयक डॉ.राजेश्वर राहांगडाले यांनी केले.
या कार्यक्रमाला प्रा.डॉ.प्रफुल राजुरवाडे,प्रा.डॉ.कत्रोजवार,प्रा.आशुतोष पोपटे,प्रा.राकेश कुमरे, प्रा.रिना भोयर,प्रा.वाघमारे,प्रा. रुपाली भरडे,प्रा.वर्षा सोनटक्के, प्रा.शितल वानखेडे,प्रा.वाकडे यांनी परिश्रम घेतले.
विद्यार्थिनीचा प्रचंड प्रतिसाद होता.