रूपेश बारापात्रे
शहर प्रतिनिधी
आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव (भू.) या गावी राहणारे निखिल धार्मिक यांची प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असल्याने त्यांच्या निवडीबद्दल आनंद साजरा केला जात आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तथा दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष, मार्गदर्शक व आमदार बच्चु कडू यांच्या हस्ते निखिल धार्मिक यांना जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रहार जनशक्ती पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निखिल धार्मिक यांच्याकडे गडचिरोली, धानोरा, आरमोरी, वडसा, कुरखेडा, कोरची या सहा तालुक्याची जबाबदारी दिली गेली आहे.
निखिल धार्मिक हे प्रहार जनशक्ती पक्षात मागील बऱ्याच वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते आहेत, शेतकरी,शेतमजूर,दिव्यांग,विधवा,निराधार व सर्वसामान्य जनता यांचे विविध प्रश्न घेऊन ते नेहमी प्रशासनाशी लढत असतात. त्यांच्या कार्याची दखल यावेळी आ.बच्चु कडू यांनी घेतली आहे.
बच्चू कडू दिव्यांगा च्या दारी अभियानला गडचिरोली दौऱ्यावर आले असतांना परतीच्या प्रवासात डोंगरगाव (भू.) येथे निखिल धार्मिक यांच्या राहते घरी सदिच्छा भेट दिली व त्यांना नियुक्तीपत्र बहाल गेले
निखिल धार्मिक यांनी सांगितले की,आपणास दिलेली जबाबदारी योग्य रित्या पार पडणार व नेहमी जनतेचे सेवक म्हणून करत राहणार.