समर्थ महाविद्यालयाचा चंद्रहास खंडारे उत्कृष्ठ स्वयंसेवक विद्यापीठात सत्कार…

 

चेतक हत्तीमारे 

जिल्हा प्रतिनिधी 

          लाखनी, 27 सप्टेंबर राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा विद्यार्थी चंद्रहास विनोद खंडारे या विद्यार्थी २०२२-२३ या शैक्षणिक सत्रातील उत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारे सत्कार करण्यात आला.

          विद्यापीठाच्या रा. से. यो. विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, संचालक डॉ.सोपान देव पिसे, प्राचार्य डॉ.दिगांबर कापसे यांचे हस्ते विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात चंद्रहास खंडारे यास प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

          राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या नियमित कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन, रक्तदान शिबीर आयोजन तसेच रक्तदान मध्ये सहभाग, वैद्यकीय शिबिरांचे आयोजनासाठी सहभाग, एड्स जनजागृतीसाठी विशेष प्रयत्न, नवीन मतदार नोंदणी तथा मार्गदर्शन,पर्यावरण जनजागृतीसाठी प्रयत्न, प्रधानमंत्री जन धन योजना सहयोग, स्वच्छता अभियान, विद्यापीठ तसेच राज्यस्तरीय विविध राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये उपस्थिती, योग दिवस कार्यक्रम सहभाग, नागपूर मॅरेथॉन मध्ये एकता दौड मध्ये सहभाग ईत्यादी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये चंद्रहास खंडारे यांनी सहभाग घेतला होता.

           यावेळी राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.धनंजय गिर्हेपुंजे,सहप्रमुख डॉ.बंडू चौधरी, सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.