असे प्रकार घडू नये म्हणून आळंदी देवस्थान मध्ये स्थानिक विश्वस्त असणे आवश्यक… — मंदिर समितीत विश्वस्त पदासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे.:-शिरीष कारेकर यांनी केली जिल्हा सत्र न्यायाधीशांकडे मागणी…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेले श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी मागणी आळंदी येथील सामाजिक कार्यकर्ते शिरीष कारेकर यांनी जिल्हा सत्र न्यायाधीश पुणे यांना निवेदन देऊन केली आहे. 

    यावेळी शिरीष कारेकर यांनी सांगितले की आळंदीत बारा महिने प्रत्येक महिन्याच्या, पंधरा दिवसांच्या एकादशी, गुरुवार, रविवार त्याच प्रमाणे आषाढी आणि कार्तिकी यात्रा मोठ्या प्रमाणावर भरली जाते, त्यामुळे सदर ठिकाणी येणाऱ्या अडचणी, समस्या याविषयी स्थानिकांना जवळून माहिती असते अशा वेळी स्थानिक प्रतिनिधी विश्वस्त असणे आवश्यक आहे. स्थानिक विश्वस्त मंदिर समितीत पुर्ण वेळ देऊ शकतो, ऐनवेळी निर्माण होणाऱ्या समस्या यावर तात्काळ उपाययोजना स्थानिक विश्वस्त करु शकतील, तसेच आषाढी आणि कार्तिकीला स्थानिक नागरिक आणि आळंदी देवस्थान यांच्यात कायम तनावाचे वातावरण निर्माण होत असते, मंदिर समिती आणि स्थानिकांमध्ये प्रवेश पासासंदर्भात तणाव निर्माण होताणा कायम दिसत आहे, अशा प्रकार घडू नये यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतील सहा विश्वस्तांपैकी तीन विश्वस्त स्थानिक असावेत अशी मागणी यावेळी शिरीष कारेकर यांनी केली आहे.

       संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विश्वस्त पदावर स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी आळंदीकरांनी वैयक्तिक हेवे दावे विसरून एकत्र येऊन जेजुरीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्थानिकांना विश्वस्त मंडळावर समावून घेण्यासाठी एकजुट दाखवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील इतर तिर्थक्षेत्रातील देवस्थान मध्ये स्थानिक प्रतिनिधी आहेत पण आळंदी मधील स्थानिक संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीत विश्वस्त पदासाठी कायम वंचित राहिला आहे.