चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
मुरमाडी / तुप :- लक्ष्मी शिक्षण संस्था व कीडा मंडळ केसलवाडा / वाघ द्वारा संचालित स्व. निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी / तुप येथे आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. भेदराज बी.ढवळे होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. विश्वास खोब्रागडे यांनी लोकशाहीचे आधारस्तंभ असलेलो महत्वपुर्ण घटक कार्यपालीका न्यायपालीका, विधीमंडळ व प्रसारमाध्यमे यांची सद्याच्या भारतीय राजकारणात लोकशाहीला मारक असलेली मुस्कुटदाबी दिसुन येते. यांची मुस्कटदाबी होता कामा नये तेव्हाच भारतात लोकशाही नांदेल असे प्रतिपादन केले.
तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य भेदराज बी. ढवळे यांनी जोपर्यंत भारतात आर्थिक विषमता, जातीभेद ह्या गोष्टी संपत नाही तोपर्यंत सुदृढ लोकशाहीचा विकास होणार नाही असे मार्गदर्शन केले..
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. स्नेहा शामकुवर यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. भुवनेश्वरी वाघाये यांनी केले. तर आभार करिष्मा ब्राम्हणकर या विद्यार्थीनीने केले. या प्रसंगी ग्रंथपाल प्रा. विशाल गजभिये प्रा. डॉ. श्रीकांत भुसारी, प्रा. डॉ. अर्चना निखाडे, प्रा. डॉ. भुवनेश्वरी वाघाये, प्रा. स्नेहा शामकुवर प्रा. जोत्सना शेळके, प्रा. डॉ. राहुल चुटे, प्रा. एम. एच फुलझेले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता लिपीक खेमराज वाघाये, श्रीकांत धुर्वे, अजय मेश्राम, ग्रंथालय परिचर गितेश्वरी तरोणे, महाविद्यालयीन शिपाई किशोरी ननोरे, अमर जांभूळकर, तेजेंद्र सदावर्ती, शोएब शेख, देवेंद्र मेंढे व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.